www.24taas.com, मुंबई
बिटल्स या जगप्रसिद्ध बँन्डला पन्नास वर्ष पूर्ण होतायेत. बिटल्स १९६० च्या दशकात संपूर्ण संगितविश्वावर अधिराज्य गाजवलं. तरुणाईला ज्या बँन्डनं मोहिनी घातली असा हा बिटल्स फक्त लंडनपुरता मर्यादित न राहता जगातल्या तरुणाईचा आवाज झाला.
‘बिटल्स’ या एका नावानं १९६०च्या दशकातल्या अवघ्या जगावर गारुड घातलं होतं. बिटल्सच्या या बँन्ड ग्रुपनं आपल्या संगिताच्या तालावर अवघ्या जगाला थिरकायला लावलं. १९६०मध्ये लंडनच्या जॉन, पॉल, जॉर्ज आणि रिंगो या ४ संगितवेड्या तरुणांनी आपली लाँग प्लेट डिस्क बाजारात आणली. या डिस्कची त्यावेळी फारशी दखल घेतली गेली नाही. मात्र ती फक्त एका संगीतक्रांतीची सुरुवात होती. त्यानंतर बिटल्स बँडनं मानवी जिवनात एक इतिहास घडवला.
एकानं लिहलेल्या, दुस-यांनी संगितबद्ध केलेल्या ओळी, तिस-यांनं गाण्याच्या काळात बिटल्सनं स्वतःची गाणी स्वतः लिहली, स्वतः संगितबगद्ध केली आणि स्वतः गायली देखील. बिटल्सच्या कारकिर्दीत अकरा रेकॉर्डस् निघाल्या. बिटल्स हे फक्त संगीतचं राहिलं नाही तर तो जगातल्या तरुणाईचा आवाज झाला. जन्माला आली तेव्हापासून दुस-या महायुध्दाच्या मानवी संहार पाहिलेल्या ब्रिटनमधील आणि तेव्हाची जगातील एक पिढी तरुण झाली होती. त्या पिढीला पुन्हा तिसरं महायुध्द नको होते.
ही पिढी बिटल्सच्या संगितात रममाण झाली. गोल गळ्याचे जॅकेट्स, लांब केस आणि हातात गिटार घेतलेली तरुणाईच्या तोडीं असलेली बंडखोरीची भाषा स्टेटस सिम्बॉल बनली होती. तरुणाची बदललेली मानसिकता, त्यांची भाषाशैली, आणि जिवनशैली बिटल्समध्ये दिसू लागली. रुढ चालीरितींना तिलांजली देऊन भौतिक जगाकडं तुच्छतेनं पाहणा-या त्या तरुण पिढीनं बिटल्सला डोक्यावर घेतलं. त्या काळी ज्या चळवळी जन्माला आल्या. त्या चळवळींचा आवाज होता बिटल्स.
जे प्रचलित होतं ते झुगारुन चौकटीपलिकडचं करण्याचं धाडस करण्याची प्रेरणा बिटल्सनं तरुणाईला दिली. त्यामुळंच अनेक चळवळींवर बिटल्सचा प्रभाव स्पष्टपणं दिसतं होता. लंडन ते शिकागो आणि शिकागो ते मुंबई सर्वत्र बिटल्सचा जयघोष होता. त्याकाळी भारतातल्या रेडिओ सिलोनवर फक्त भारतीय शास्त्रीय संगितच चित्रपट संगीत ऐकवंल जायचं. बिटल्सचा प्रभाव इतका होता की रेडिओ सिलोनवरही बिटल्सचं संगित ऐकवावं लागलं. आणि ते तितकचं लोकप्रियही झालं.
बिटल्सचा भारताशी संबध नव्हता असही नव्हता या ग्रुपची भारताशी नाळ जोडली गेली होती. महर्षी महेश योगी यांच्याकडून या ग्रुपनं अध्यात्मिक दीक्षा घेतली होती. त्यावेळी काही काळ हा ग्रुप भारतात होता. बिटल्सपैकी एक असलेल्य़ा जॉर्जनं सतारवादक पंडित रवीशंकर यांना आपला गुरु मानलं होतं.
१९६० च्या दशकात या बँडचे अनेक शो जगभरात झाले. प्रसिद्धीची मोठी माध्यमं नसतानाही बिटल्सच्या शोला लाखो तरुण तरुणींच्या उड्या पडत होत्या. बिटल्सला पन्नास वर्ष झाली असली तरी बिटल्स कालबाह्य झालं नाही.... ते आजही तेवढचं ताजं आहे.चिरतरुण आहे.