डिसेंबरमध्ये गुणीदासची स्वर्गिय मैफल

केवळ मुंबईतीलच नव्हे तर देश विदेशातील संगीत रसिक ज्याची आतुरतेने प्रतिक्षा करतात ते गुणीदास संगीत संमेलनाचे आयोजन वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये १ डिसेंबर ते ३ डिसेंबर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र ललित कला निधीने ३५ व्या गुणीदास संगीत संमेलनाचे आयोजन करताना त्याच्या संपन्न परंपरेची जपणुक करत शास्त्रिय संगीतातील दिग्गजांना आमंत्रित केलं आहे....

Updated: Nov 19, 2011, 02:24 PM IST
झी २४ तास वेब टीम, मुंबई
केवळ मुंबईतीलच नव्हे तर देश विदेशातील संगीत रसिक ज्याची आतुरतेने प्रतिक्षा करतात ते गुणीदास संगीत संमेलनाचे आयोजन वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये १ डिसेंबर ते ३ डिसेंबर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र ललित कला निधीने ३५ व्या गुणीदास संगीत संमेलनाचे आयोजन करताना त्याच्या संपन्न परंपरेची जपणुक करत शास्त्रिय संगीतातील दिग्गजांना आमंत्रित केलं आहे....
संमेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ डिसेंबर २०११ रोजी सांयकाळी पंडित विश्व मोहन भट्ट यांचे मोहन वीणा वादन आणि बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाचा स्वर्गीय आनंद रसिक श्रोत्यांना लुटता येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ डिसेंबर २०११ रोजी सांयकाळी ६.३० वाजता पंडित सूहास व्यास यांचे गायन आणि पंडित हरीप्रसाद चौरसिया यांचे बासरी वादनाची मैफिल सजणार आहे. संमेलनाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ३ डिसेंबर २०११ रोजी पंडित श्रीनिवास जोशींचे शास्त्रिय गायन, उस्ताद अमजद अली खान यांचे सरोद वादन आणि संगीत मार्तंड पंडित जसराज यांच्या गायनाने सांगता होणार आहे.