दादांनंतर राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे

जलसंपदा विभागाबाबत होत असलेल्‍या आरोपांनंतर उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी आज राजीनामा दिला. पवार यांनी उर्जामंत्रीपदाचाही राजीनामा दिला आहे.

Updated: Sep 25, 2012, 08:20 PM IST

www.24taas.com, मुंबई
अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर लगेचच अजित पवार यांच्या घरी राष्ट्रवादीच्या बैठक झाल्यानंतर लगेचच मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्याकडे आपले राजीनामे सोपावले आहेत.
जलसंपदा विभागाबाबत होत असलेल्‍या आरोपांनंतर उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी आज राजीनामा दिला. पवार यांनी उर्जामंत्रीपदाचाही राजीनामा दिला आहे. पवार यांनी अचानक उचललेल्‍या पावलामुळे महाराष्‍ट्राच्‍या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी काँग्रेसला दे धक्का दिल्याचे म्हटंले जात आहे.
मात्र सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारला सध्या तरी काहीही धोका नसल्याचे म्हटंले जात आहे. परंतु काँग्रेसला राज्यात अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न केला जात असल्याचे मत आहे.