www.24taas.com, झी मीडिया, पुणे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत भाषणादरम्यान पुन्हा एकदा पातळी सोडून वक्तव्य केलंय.
जपून बोला नाही तर माध्यमं झोडपून काढतात आणि त्याची किंमत मोजावी लागते, असा मोलाचा सल्ला कार्यकर्त्यांना देताना स्वत: अजितदादांचा मात्र तोल सुटला आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर अजित पवारांनी असभ्य शब्दांत टीका केली.
‘माध्यमांसमोर जपून बोला... ते त्यांना हवंय तेवढंच काटछाट करून दाखवतात. नाहीतर एकेकाचं तुम्ही बघताय... म्हणतात, निवडणुकीवर एवढा, तेवढा खर्च केला. पार पिवळं व्हायची वेळ आलीय’ या दादांच्या वक्तव्यानं कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.
यानंतर दादा एवढ्यावरच थांबले नाहीत, तर कार्यकर्त्यांना त्यांनी जपून कसं बोलावं याबद्दलही भाषण दिलं. दादा आपल्या भाषणात म्हणाले, ‘आपल्याला का कमी मतदान झालं याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. आपणं काही चुकीचं बोललो का? आपल्या वक्तव्याचा कुणी विपर्यास केला का? आपल्या भाषणातून एखादा समाज दुखावला गेला का? यावर आपण विचार करायला हवा’ असंही दादांनी म्हटलंय.
दरम्यान, निवडणूक आयोगाची नोटीस मिळाली आहे. चार दिवसांत योग्य उत्तर देणार असं स्पष्टीकरण भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिलंय. मुंडेनी गेल्या निवडणुकीत आठ कोटी रुपये खर्च केल्याचं विधान केलं होतं. त्यामुळं त्यांना मनोटी पाठवण्यात आलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.