www.24taas.com, लंडन
लठ्ठपणामुळे तुम्ही त्रस्त आहात आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हांला काही मार्ग सापडत नसेल तर झोपून जा….. हो आम्ही तुमची चेष्टा करीत नाही आहोत हे खरं आहे.
लंडनच्या वॉशिंग्टन युनिवर्सिटीने केलेल्या एका अभ्यासात ही गोष्ट समोर आहेली आहे. २४ तासांपैकी ९ तास झोप घेतल्यास हळूहळू लठ्ठ व्यक्तीचे वजन कमी होते. झोपण्याच्या सवयीने लठ्ठ होण्याच्या जीन्सवर विपरीत परिणाम होत असल्याचे संशोधकांचे मत आहे.
अभ्यासकर्त्यांनी केलेल्या संशोधनानुसार सात तासांपेक्षा कमी झोपणाऱ्या व्यक्तीचे वजन खूप जास्त आहे. परंतु ज्या व्यक्ती नऊ तास किंवा त्यापेक्षाही अधिक झोपतात त्यांचे वजन कमी असते, असे द डेली टेलीग्राफने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.