अण्णांच्या आंदोलनासाठी प्रशासनानेही कंबर कसल्याचे चित्र दिसून येत आहे. आंदोनावरून टीम अण्णांना राज्य सरकारने चांगलाच दम दिला. काही प्रक्षोभक विधानं केल्यास अण्णांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती गृहसचिव उमेशचंद्र सारंगी यांनी दिली. आंदोलनाच्या काळात टीम अण्णांच्या वक्तव्यांवर राज्य सरकारचे लक्ष असणार आहे, त्यामुळे काही विधानं केल्यास कायद्याच्या चौकटीत कारवाई होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येतं आहे.
दरम्यान अण्णा हजारे मुंबईत दाखल झाले आहेत. राळेगण सिद्धीवरुन अण्णा आळंदी ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी स्थळी नतमस्तक होण्यासाठी गेले होते. अण्णा उद्या पासून मुंबईतील एमएमआरडीए मैदानात उपोषणासाठी बसणार आहेत. त्यांनी ३० तारखेपर्यंत उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर अण्णा दिल्लीत सोनिया गांधींच्या निवासस्थाना समोर आंदोलन करणार आहेत.
पुण्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणा यांनी अण्णांवर हल्ला चढवला. देश आर्थिक मंदीचा सामना करत असताना अण्णांनी आंदोलन उभं करण्याने देशात अस्थिरता निर्माण होऊल असं मुख्यमंत्री म्हणाले.
[jwplayer mediaid="18935"]