वजन घटवण्यासाठी सहाय्य करु शकेल असं च्युईंग गम विकसीत करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांचा चमु करत आहे. सायराकूझ विद्यापीठात केमिस्ट रॉबर्ट डॉयल यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांची एक टीम हा पथदर्शी ठरु शकणारा अभ्यास करत आहेत. पीवायवाय हे हार्मोन्स माणसाच्या रासायनिक व्यवस्थेचा भाग असते जे भूकेचं आणि उर्जेचं नियंत्रण करतं. लोकांनी भोजन किंवा व्यायाम केल्यानंतर पीवायवाय रक्त वाहिन्यांमध्ये सोडलं जातं. एखाद्या व्यक्तीने किती कॅलरीजचा आहार घेतला आहे त्यावर पीवायवायचे प्रमाण अवलंबून असतं. आता पहिल्यांदाच तोंडावाटे च्युईंगमच्या माध्यमातून हे हार्मोन्स पोटात जाणार आहे.
पीवायवाय हा आहार नियंत्रित करणारं हार्मोन्स आहे. पण ते तोंडवाटे घेतल्यास पोटात नष्ट होते आणि जे नष्ट होत नाही ते आतड्यांवाटे रक्त वाहिन्यांमध्ये पोहचण्यास अडथळे निर्माण होतात. पीवायवाय पचन संस्थेतून नष्ट न होता रक्तवाहिन्यांपर्यंत पोहचणं हे आव्हाऩ आहे. काही वर्षापूर्वी डॉयल यांनी हार्मोन्स इन्स्युलीन तोडांवाटे घेण्यासाठी B12 या विटामीनच्या माध्यमाचा वापर केला होता. पचन संस्थेतून B12 विटामीन इन्स्यूलीनसह सहजरित्या रक्तवाहिन्यांपर्यंत पोहचतं.
आता डॉयल यांच्या संशोधन करणाऱ्या टीमने पेटंटच्या प्रतिक्षेत असलेल्या B12 विटामीनला पीवायवाय हार्मोन्सची जोड दिली. यातल्या पहिल्या टप्प्यात किती प्रमाणात पीवायवाय रक्तवाहिनीपर्यंत पोहचू शकतं याचा अभ्यास करण्यात आला आणि त्याच्या पाहणीनंतरचे निष्कर्ष उत्साहदायक आहेत. यानंतरचा टप्पा B12 विटामीनसह पीवायवाय च्युईंग गम किंवा टॅबलेटच्या रुपाने घेता येईल अशा प्रकारे विकसीत करणं हा होता. ज्याप्रमाणे धुम्रपानाची सवय सुटावी म्हणून निकोटीनयुक्त गम विकसीत करण्यात आला त्याचधर्तीवर हा प्रयोग करायचा होता. आता हा प्रयोग यशस्वी झाला तर च्युईंगगमच्या सहाय्याने नैसर्गिक रित्या लोकांना वजन घटवणे शक्य होणार आहे.
एकाद्या व्यक्तीने समतोल भोजन घेतल्यानंतर चुईंग खाल्ल्यास पीवायवाय सप्लीमेंट तीन ते चार तासानंतर रक्त वाहिनेमध्ये सोडलं जाईल त्यामुळे पुढच्या भोजनाअगोदर भूक कमी होण्यास मदत हील. अमेरिकन केमिकल सोसायटीच्या जर्नल ऑफ मेडिसिनल केमिस्ट्रीच्या वेबसाईटवर 4 नोव्हेंबर 2011 रोजी हा अभ्यास प्रकाशीत करण्यात आला होता.