सचिन सर ब्रॅडमनपेक्षाही महान आहे- चॅपेल

सचिन हा सर डॉन ब्रॅडमनपेक्षाही महान खेळाडू आहे. चॅपेल यांचं म्हणणं असं आहे की, बॅटींगही एक कला आहे, तर सचिन एक पिकासो आहे, त्यामुळे सचिनला त्यांनी डॉन ब्रॅडमनपेक्षा महान आहे असं म्हटलं आहे.

Updated: Mar 20, 2012, 04:55 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

टीम इंडियाचे माजी कोच ग्रेग चॅपेल यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे. पण यावेळेस तो कोणताही वाद ओढावून घेणार नाहीत.. कारण की त्यांनी पहिल्यांदाच एका भारतीय खेळाडूचं कौतुक केलं आहे आणि तेही तोंड भरून कौतुक केलं आहे.

 

सचिनने शंभरावं शतक झळकावल्यानंतर सगळ्याच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. असचं काहीस कौतुक टीम इंडियाचे माजी कोच ग्रेग चॅपेल यांनी केलं आहे. सचिन हा सर डॉन ब्रॅडमनपेक्षाही महान खेळाडू आहे. चॅपेल यांचं म्हणणं असं आहे की, बॅटींगही एक कला आहे, तर सचिन एक पिकासो आहे, त्यामुळे सचिनला त्यांनी डॉन ब्रॅडमनपेक्षा महान आहे असं म्हटलं आहे.

 

त्यांनी असं म्हटलं आहे की, सचिन जवळजवळ १०० कोटी लोकांच्या अपेक्षाचं ओझ घेऊन खेळतो, आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करीत असतो. आणि त्याचा हाच पैलू त्याला ब्रॅडमनपेक्षाही महान खेळाडू म्हणून मान्यता मिळवून देतो. पण जेव्हा चॅपेल हे भारतीय टीमचे कोच म्हणून होते. तेव्हा सचिन आणि चॅपेल यांच्यात मतभेद होते.

 

तर इंग्लंडचा माजी फास्ट बॉलर एगंस फ्रेजरने म्हटलं की, सचिनचं १०० शतकाचं विक्रम हा एक अद्भुत कारनामाच आहे. फ्रेजरच्या मते सचिनचा रेकॉर्ड हा ब्रॅडमन यांचा ९९.९४ असा स्ट्राईक रेटचा रेकॉर्ड किंवा पेलेचा १२४१ गोलचा रेकॉर्डपेक्षाही फार मोठा असा त्याचा रेकॉर्ड आहे. कारण तो १०० कोटी लोकांच्या दबावाखाली खेळत असतो.