www.24taas.com, मुंबई
क्रिकेट खेळणा-या कोणत्याही मुलाला विचारल कि तुला कोण व्हायचंय तर उत्तर ठरलेल...सचिन तेंडुलकर...लाखो-करोडो लोकांच्या गळ्याचा ताईत असलेला सचिन आपल्या कुटुंबियांच्या सुद्धा फारच जवळ राहिलाय..क्रिकेटमुळं नेहमीच घराबाहेर राहवं लागलं असलं तरी त्यामुळे सचिन आणि त्याच्या कुटुंबियांमध्ये अंतर कधीच निर्माण झालं नाही..यालाही सचिनचं व्यक्तिमत्वच कारणीभूत ठरलय...
१) आदर्शपुत्र सचिन
सचिन का ग्रेट आहे.. याची कारणं असंख्य आहेत. त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वातूनच त्याची महानता दिसून येते. ही गोष्ट आपोआप घडलेली नाही तर सचिननं ती घडवलीय..त्यासाठी त्यानं आपल्या वडीलांनी दिलेली एक शिदोरी बांधून ठेवली..
आयुष्यात काहीही झालं तरी मनुष्याचा स्वभाव त्याच्या बरोबरच राहतो आणि तो त्याच्या या स्वभावामुळेच ओळखला जातो.. ही वडीलांची शिकवण सचिनने नेहमीच लक्षात ठेवली. आणि तो तसाच वागला...
सचिन भावंडात सर्वात लहान त्यामुळे तो सर्वांचाच लाडका..पण या लाडामुळे तो बिघडला नाही तर तो घडला....
२) कुटुंबवत्सल सचिन
प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर असूनही सचिनला स्टारडमचा आणि आपल्या पोझिशनचा कोणताही गर्व नाही. तसाच सचिन जेव्हा क्रिकेट खेळत नाही तेव्हा तो सर्व वेळ फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबासोबतच घालवतो. आपण क्रिकेट खेळायला सुरवात केली ती आपल्या मोठ्या भाऊ अजित मुळेच असं तो अभिमानाने सांगतो तर दुसरी कडे आपला मुलला आपलं करिअर निवडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचंही तो सांगतो.
प्रत्येकानं आयुष्यात तेच करावे ज्यात त्याची आवड आहे, त्याचं प्रेम आहे, ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो आणि तेच महत्वाच आहे. आणि म्हणूनच अर्जुनला आपलं करिअर निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे असं सचिन सांगतो. सचिन फक्त उपदेस देऊन मोकळा होत नाही तर तो अर्जुन कडून तसा अभ्यासही करुन घेतो.
पत्नी अंजली आणि मुलगी सारा दोघींवरही सचिन आतोनात प्रेम करतो आणि आपल्या प्रत्येक ब-या वाईट प्रसंगी परिवारानं आपल्याला पूर्ण सपोर्ट दिलाचंही तो ठामपणे सांगतो..वर्षातील बरेच दिवस क्रिकेटमुळे परिवारापासून दुर राहत असलेला सचिन आपल्या कुटुंबाच्या सर्वात जवळ आहे..
३) खोडकर सचिन
संयमी, शांत, मितभाषी आणि नेहमीच हसतमुख सचिनची अजून एक बाजू आहे. ही त्याच्या चाहत्यांना काहीशी नविन वाटेल मात्र ती फारच जूनी आहे. आपला सचिन खोड्या काठण्यातही पटाईत आहे. लहानपणी जसा तो खोडकर होता तसा आताही आहेच. शाळेत, घरी, मैदानात आणि ड्रेसिंगरुममध्येही मास्टर कमालीची धमाल करतो.
हो पण आपल्यामुळे कोणाला नाहक त्रास होणार नाही याचीही तो तितकीच काळजी घेतो. लहान असताना एकदा अशाच एका खोडीमुळे सचिनला त्याच्या आचरेकर गुरुंची एक टपली बसली होती..
त्या एका टपलीमुळे कालच्या त्या सचिनचा आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर झालाय...