पाकिस्तान प्रीमियर लीगसाठी भारताला आमंत्रण

पाकिस्तान प्रीमियर लीग (पीपीएल) कधी सुरू होणार आहे, हे अजून नक्की नाही. त्याच्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत की योजना अजून बंद दाराच्या बाहेर पोहोचल्या नाहीत. तरीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाका अश्रफ यांनी भारतीय खेळाडूंना पीपीएलसाठी आमंत्रित करणार असल्याची घोषणा केली आहे

Updated: Jun 7, 2012, 03:45 PM IST

www.24taas.com, कराची

 

पाकिस्तान प्रीमियर लीग (पीपीएल) कधी सुरू होणार आहे, हे अजून नक्की नाही. त्याच्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत की योजना अजून बंद दाराच्या बाहेर पोहोचल्या नाहीत. तरीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाका अश्रफ यांनी भारतीय खेळाडूंना पीपीएलसाठी आमंत्रित करणार असल्याची घोषणा केली आहे.

 

या संदर्भात अश्रफ म्हणाले, “आम्ही आमच्याकडून भारताला आमंत्रण पाठवलं आहे. यायचं की नाही हे त्यांचं ते ठरवतील. दोन्ही देशांतील क्रिकेट बोर्डंमधील संबंध सुधारावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कारण भारत पाकिस्तान यांच्यातील खेळ बघण्याची इच्छा दोन्हीकडील क्रिकेटप्रेमींना आहे.”

 

“राजकारण खेळापासून दूर ठेवणंच पाकिस्तानसाठी योग्य ठरेल. कारण, त्यामुळे पाकिस्तानची जागतिक स्तरावर प्रतिमा डागाळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानची प्रतिमा सुधारायचा आम्ही प्रयत्न करत आहोत.” असंही अश्रफ म्हणाले. तेव्हा आता बीसीसीआय पाकिस्तानच्या या आमंत्रणाला कसा प्रतिसाद देतंय ते पाहाणं महत्वाचं ठरेल.