जयवर्धने पायचीत

श्रीलंकेची चौथी विकेट गेली आहे. विनय कुमारच्या बॉलिंगवर महेला जयवर्धने ४३ रन्सवर पायचित झाला. श्रीलंकेचा स्कोअर १७४/४ असा आहे.याआधी आर. अश्विनच्या बॉलिंगवर गौतम गंभीरने कुमार संगकाराचा झेल पकडला होता.

Updated: Feb 14, 2012, 12:35 PM IST

www.24taas.com, ऍडलेड

 

श्रीलंकेची चौथी विकेट गेली आहे. विनय कुमारच्या बॉलिंगवर महेला जयवर्धने ४३ रन्सवर पायचित झाला. श्रीलंकेचा स्कोअर १७४/४ असा आहे.याआधी  आर. अश्विनच्या बॉलिंगवर गौतम गंभीरने कुमार संगकाराचा झेल पकडला होता. यापूर्वी   झटपट धावा काढण्याच्या नादात दिलशान तिलकरत्ने इर्फान पठाणच्या बॉलिंगवर धोनीकरवी झेलबाद झाला.  श्रीलंकेची पहिली विकेट उपुल थरंगा एकही धाव न घेता आऊट झाला. विनय कुमारच्या बॉलिंगवर धोनीने विकेट घेतली होती.

 

लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

 

सीबी सीरिजमध्ये टीम इंडिया विजय़ी ट्रॅकवर परतली आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आता श्रीलंकेला रोखण्याच टीम इंडियाला आव्हान आहे. कांगारूंना पराभवाचा धक्का दिल्यानंतर धोनी अँड कंपनीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे लंकेला पराभूत करून टेबल टॉपर बनण्याची टीम इंडियासमोर नामी संधी आहे. रोमहर्षक लढतीमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला होता. या मॅचमध्ये भारतीय बॅट्समनची बॅट चांगलीच तळपली.

 

श्रीलंकेला या सीरिजमध्ये आत्तापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही त्यामुळे पहिल्या विजायाची नोंद करण्यासाठी जयवर्धनेची टीम प्रयत्नशील असेल. लसिथ मलिंगावर त्यांची बॉलिंगची भिस्त असेल. तर बॅटिंगमध्ये तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकाराला स्फोटक बॅटिंग करावीच लागणार आहे. मिडल ऑर्डरची जबाबदारी कॅप्टन महेला जयवर्धने आणि ऍन्जेलो मॅथ्यूजवर असेल.  आता, भारतीय टीम आपली विजयी मालिका कायम राखते की, लंका आपला पहिला विजय मिळविण्यात यशस्वी ठरते याकडेच क्रिकेटप्रेमींच लक्ष असणार आहे.