'गंभीर' विकेट भारतासमोर जिंकण्याचं आव्हान

अॅडलेड वन डे मध्ये भारताला गौतम गंभीरच्या रूपाने चौथा धक्का बसला. या सीरीजमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू न शकलेला गौतम गंभीरने मात्र चांगली फटकेबाजी करत होता.

Updated: Feb 12, 2012, 05:25 PM IST

www.24taas.com, अॅडलेड

 

अॅडलेड वन डे मध्ये भारताला गौतम गंभीरच्या रूपाने चौथा धक्का बसला. या सीरीजमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू न शकलेला गौतम गंभीरने मात्र चांगली फटकेबाजी करत होता. गौतम गंभीर अगदी आत्मविश्वासाने बॅटीग करत होता. त्याने अर्धशतक केल्यानंतर त्याचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला. त्याने काही चांगल्या फटक्यांचे नमुने पेश केले.

 

मॅचचे  LIVE  अपडेट पाहाण्यासाठी क्लिक करा.

 

गंभीर शतकाजवळ पोहचला आहे असं वाटत असताना क्लीटं मकायने त्याला पायचीत पकडलं. मात्र गंभीरबाबत दिलेला हा निर्णय थोडा साशंक असा वाटत होता. गौतमने १११ बॉलचा सामना करत ९२ रनपर्यंत मजल मारली होती त्यामध्ये त्याने ७ फोर मारले होते. गंभीर आऊट झाला तेव्हा भारताचा स्कोर १७८ आणि ४ विकेट असा होता. गंभीर नंतर कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांच्यावर मॅच जिंकून देण्याची जबाबदारी आहे. धोनी ५ रनवर आणि रैना १० रनवर खेळत आहे. भारताला १२ ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी आणखी ८२ रनची आवश्यकता आहे.

 

रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात आला आहे असं वाटतं असताना एक अवाजवी फटका मारून त्याने विकेट फेकली. पण तो पर्यंत त्यांनी भारताचा स्कोर बोर्ड चांगलाच हलता ठेवला होता. रोहित शर्माने ३३ रन केले.

 

वीरेंद्र सेहवाग आऊट झाल्यानंतर भारताचा डाव सावरला तो गौतम गंभीरने. त्याला थोड्या फार प्रमाणात कोहली आणि रोहित शर्माची साथ मिळाली. मॅन इन फॉर्म असं ह्या सीरीजमध्ये म्हटलं गेलेल्या विराट कोहली मात्र चमकदार कामगिरी करू शकला नाही. तो फक्त १८ रनच करू शकला. त्यानंतर आलेल्या रोहित शर्माने चांगले फटके मारत गंभीरला चांगली साथसोबत केली. त्यातच गौतम गंभीरने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

 

भारताने तिसऱ्या वनडे मध्ये ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २७० धावांचा पाठलाग करायला सुरवात केली नेहमीप्रमाणे सेहवागने दणकेबाज सुरवात केली, पण एक आत्मघाती फटका मारून तो फक्त २० रन करून परतला त्यात तीन फोरचा समावेश होता

 

अॅडलेड इथे ट्राय सीरिजच्या भारताविरुद्धच्या वनडेत ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हर्समध्ये आठ बाद २६९ रन्सची मजल मारली. ऑस्ट्रेलियातर्फे डेव्हिड हसीने सर्वाधिक ७२ रन्सची खेळी केली. तर पीटर फॉरेस्टने पदार्पणातच ६६ रनची दमदार खेळी करुन आपली निवड सार्थ ठरवली.

 

भारतातर्फे विनय कुमार आणि उमेश यादवने प्रत्येकी २-२ विकेटस घेतल्या तर झहीर खानच्या पदरी एकच विकट पडली. भारताने कधी नव्हे ते चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना रनआऊट करत तंबुचा रस्ता दाखवला.

 

ऑस्ट्रेलिया – 269/8 (ओव्हर 50)

भारत – 192/4 (ओव्हर 38.4)