खासदार सचिन तेंडुलकर

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आज आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी सचिनला खासदारकीची शपथ दिली. सभापती दालनात सचिनच्या शपथविधीचा सोहळा पार पडला.

Updated: Jun 4, 2012, 10:29 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आज आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी सचिनला खासदारकीची शपथ दिली. सभापती दालनात सचिनच्या शपथविधीचा सोहळा पार पडला.

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आता खासदार सचिन तेंडुलकर बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून सचिन खासदारकीची शपथ कधी घेणार याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या. सचिन तेंडुलकर हा कुठल्याही पक्षातर्फे खासदार  बनला नसून  तो राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. खासदार बनल्यानंतरही क्रिकेट न सोडण्याचं सचिनने यापूर्वी जाहीर केलं होतं.

सचिनबरोबरच राज्यसभेत निवड झालेल्या अभिनेत्री रेखानं १६ मे ला राज्यसभेची शपथ घेतली होती. आता सचिन आपली राज्यसभेची नवी इनिंग कशी खेळतो याक़डेच त्याच्या चाहत्यांच लक्ष असणार आहे.