www.24taas.com, लेह
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीने रिटारयरमेंटनंतर काय करायच हे आताच स्पष्ट केलं आहे. सध्या जम्मूमध्ये सीमावर्ती भागात दौ-यावर असलेल्या धोनीने रिटायरमेंटनंतर आर्मीमध्ये काम करायला आपल्याला नक्की आवडेल असं सांगितलं आहे. भारताला टी-20 आणि वन-डे वर्ल्ड कप जिंकून देणारा टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी जर क्रिकेटपटू झाला नसता तर तो नक्कीच आर्मीमध्ये एखादा अधिकारी किंवा जवान झाला असता.
कारण त्यानेच आपल्याला आर्मीमध्ये काम करायला नक्कीच आवडेल अशी असं मत व्यक्त केलय. गेल्याच वर्षी एली पॅराशूटन रेजिमेंटमध्ये मानद लेफ्टिनंट कर्नलने सन्मानित करण्यात आलेला माही सध्या जम्मूमध्ये नियंत्रण सीमा रेषेच्या जवळ असलेल्या प्रदेशाचा दौरा करत आहे. यावेळी भारावलेल्या धोनीने आपल्याला आर्मीमध्ये काम करायला नक्कीच आवडेल मात्र क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यावर असं स्पष्ट केलय. भारतीय क्रिकेटला एका ऊंचीवर नेऊन ठेवणारा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीला क्रिकेटशिवाय जर कशामध्ये इंटरेस्ट असेल तो आर्मीमध्ये आहे...म्हणूनच तो अधिकाधिक नियंत्रण सीमा रेषेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मी नियंत्रण सीमा रेषेच्या जवळ जाण्याच प्रयत्न करणार आहे.
आर्मीतील अधिकारी ज्या आव्हांनाना सामोरे जातात ते मला पहायच आहे. मी सीमावर्ती भागात प्रथमच आलो असून मला जवानांना जवळून पहाण्याची संधी मिळालीय. साधारण: क्रिकेटपटू रिटायरमेंट घेतल्यावर एकतर कॉमेंटेटर, कोच होतात किंवा क्रिकेटची ऍकाडमी स्थापन करतात. मात्र धोनीचा हा क्रिकेटव्यतिरिक्त आणि तोही आर्मीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात असलेला इंटरेस्ट नक्कीच कौतुकास्पद आहे. त्याच्या या इंटरेस्टमुळे आर्मीमधील अधिकारी आणि जवानांना एकप्रकारची प्रेरणा तर मिळेलच याचबरोबर देशातील युवकांसमोरही एक आदर्श निर्माण होईल.