क्लार्कला भीती इंडियन मिडल ऑर्डरची

भारताने गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात याच पीचवर ऑसीजना पराभूत केलं होतं. त्यामुळे कामगिरीची पुनरावृत्ती करत टीम इंडिया सीरिजमध्ये कमबॅक करेल अशी भिती ऑसी बॅट्समन मायकल हसीला वाटते आहे.

Updated: Jan 10, 2012, 06:13 PM IST

 www.24taas.com, पर्थ

 

मेलबर्न आणि सिडनी टेस्टमधील पराभवाची परतफेड पर्थ टेस्टमध्ये करण्याकरता टीम इंडिया कसून सराव करते आहे. पण मागचा इतिहास पाहता ही टेस्ट भारतीय टीमची कसोटी पाहणारी ठरेल. भारताने गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात याच पीचवर ऑसीजना पराभूत केलं होतं. त्यामुळे कामगिरीची पुनरावृत्ती करत टीम इंडिया सीरिजमध्ये कमबॅक करेल अशी भिती ऑसी बॅट्समन मायकल हसीला वाटते आहे.

 

ऑस्ट्रेलियातील पराभवाचा आतापर्यंतचा इतिहास बदलण्याच्या तयारीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय टीमला सीरिजच्या पहिल्या दोन्ही टेस्टमध्ये सपाटून मार खावा लागला. त्यामुळे चॅम्पियनशीपचे दिवास्वप्न पाहणाऱ्या भारतीय फॅन्स आणि क्रिकेट वर्तुळातून टीम इंडियावर चोहोबाजूंनी टिकेची झोड उठली आहे. त्यामुळेच भारतीय टीम आपली प्रतिष्ठा वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणुन आता पर्थ येथे होणाऱ्या तिसऱ्या टेस्टमध्ये 'जी जाँन' से लढण्यास सज्ज झाली आहे. पर्थमधील वाका पीचवरील भारताचा आतापर्यंतचा इतिहास पाहता, टीम इंडियाला तिसऱ्या टेस्टमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणर आहे.

 

पण २००७ - ०८ मध्ये ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर भारतीय टीमने वाकाच्या वेगवान पीचवर कांगारूंना वाकवण्याची केलेली किमया आजही ऑसी प्लेअर्सच्या मनात घर करून आहे. त्यामुळेच पर्थ टेस्टमधुन टीम इंडिया सीरिजमध्ये कमबॅक करेल अशी भिती ऑस्ट्रेलियन मिडल ऑर्डर बॅट्समन मायकल हसीने व्यक्त केली आहे. सध्या सुरू असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियन टीमच वरचढ दिसते आहे. त्यामुळे त्यांचंही मनोबल निश्चितच उंचावलं असेल. पण गेल्या दौऱ्यातील या पीचवरील टीम इंडियाच्या कामगिरीने कांगारूंना धोक्याचा इशारा दिला असून, तिसऱ्या निर्णायक टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन टीम भारताला कमी लेखण्यास अजिबात तयार नाही.