कोकाकोलाच्या कॅनवर सचिनची छबी

कोकाकोला इंडिया सचिन तेंडुलकरच्या शंभराव्या विश्वविक्रमी शतक साजरं करण्यासाठी त्याची छबी असलेले ७.२ लाख गोल्डन कॅन्सची निर्मिती करणार आहे. सचिनने नुकत्याच झालेल्या एशिया कपच्या सामन्यात बांग्लादेशाच्या विरुध्द १०० विश्वविक्रमी शतकं फटकावलं.

Updated: Mar 25, 2012, 10:50 PM IST

www.24taas.com, मुंबई

 
कोकाकोला इंडिया सचिन तेंडुलकरच्या शंभराव्या विश्वविक्रमी शतक साजरं करण्यासाठी त्याची छबी असलेले ७.२ लाख गोल्डन कॅन्सची निर्मिती करणार आहे. सचिनने नुकत्याच झालेल्या एशिया कपच्या सामन्यात बांग्लादेशाच्या विरुध्द १०० विश्वविक्रमी शतकं फटकावलं. कोकाकोला इंडियाचे मार्केटिंग डायरेक्टर वसिम बशिर म्हणाले की आम्ही ७.२ लाख गोल्डन कॅन्स बाजारात उपलब्ध करुन देणार आहोत आणि ते थोड्याच दिवस हाताहात खपतील.

 

आजवरच्या इतिहासात कोकाकोला इंडिया पहिल्यांदाच एकाद्या व्यक्तीचा सन्मान करत आहे. कोकाकोलाने पहिल्यांदाच कॅनवर छबी छापण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी २०११ मध्ये सचिनने निवडलेली शतके दाखवणारे विविध रंगांचे नऊ कॅन कोकाकोलाने बाजारात आणले होते. सचिनच्या १०० व्या शतकाच्या प्रतिक्षेत १० वी लिमिटेड गोल्डन एडिशन बाजारात आणण्यात आली नव्हती.

 

कोकाकोला इंडियाच्या अरुण नारायण आणि मुंबईच्या डिझाइन ओआरबी यांनी या गोल्डन कॅनचे डिझाइन तयार केलं आहे. लवकरच सचिनची छबी असलेला कोकाकोलाचा गोल्डन कॅन बाजारात उपल्बध होईल.