बहुतेक २०१५चा वर्ल्डकप खेळीन - सचिन

सचिन तेंडुलकरने महाशतकानंतर पहिल्यादांच मीडियासमोर बोलताना आपल्या भावना मोकळ्या केल्या, मात्र त्याचबरोबर त्याच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देखील दिलं पण ते देखील त्याच्या नेहमीच्या शैलीत.

Updated: Mar 26, 2012, 01:32 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

सचिन तेंडुलकरने महाशतकानंतर पहिल्यादांच मीडियासमोर बोलताना आपल्या भावना मोकळ्या केल्या, मात्र त्याचबरोबर त्याच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देखील दिलं पण ते देखील त्याच्या नेहमीच्या शैलीत. सचिनला त्याचा निवृत्तीबद्दल विचारले गेले आणि आपण सध्यातरी निवृत्त होणार नाही हे त्याने स्पष्ट केलं.तो मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होता. 

 

सचिन २०१५चा वर्ल्डकप खेळणार??

 

"माझा प्रयत्न असेन की पुढचा वर्ल्डकप मी खेळू. २०१५चा वर्ल्डकप खेळीन की नाही माहीत नाही, माझ्या चाहत्याने जर वाटतं की, मी खेळावं तर मी प्रयत्न करीन बाकी सगळं देवाच्या हातात आहे". "२००७ मध्ये मला विचारलं होतं की, २०११ वर्ल्डकप खेळणार का? तेव्हाही मी उत्तर देणं टाळलं होतं". असं म्हणतं सचिनने सणसणीत स्ट्रेट डाईव्हच मारला. सचिनने जणू काही स्पष्ट केलं की, मला जरा जमलं तर मी पुढचा वर्ल्डकपही खेळीन, या उत्तराने त्याच्या सगळ्याच टीकाकरांची तोडं त्यांने बंद करून टाकली.  

 

काय आहे सचिनच्या यशाचं गमक?

 

क्रिकेटमधील सर्वोच्च स्थानावर असलेला सचिन हा नेहमीच सर्वोच्च स्थानावर राहिला आहे त्यामुळे त्याच्या यशाचं गमक काय आहे? ते देखील त्याने स्पष्ट केले. 'स्वप्नापर्यंत पोहचायचं असेल तर मार्ग नेहमीच खडतर असतो, शॉर्टकट कधीच वापरू नका'. 'स्वप्न पाहा आणि साकारण्यासाठी मेहनत करा, माझे कोच आचरेकर यांनी मला जास्तीत जास्त मॅच खेळायले दिले त्याचाच फायदा आज मला होतो आहे'. मी क्रिकेटचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि यामुळेच यश हे सचिनवर अक्षरश: जीव ओवाळून टाकत असतो 

 

 

महाशतकाचा रेकॉर्ड एखाद्या भारतीयानेच मोडावा - सचिन 

 

गेले वर्षभर सचिनच्या महाशतकाची सगळेच वाट पाहत होते. त्यामुळे सचिनने महाशतक हे फार खडतर होतं असं प्राजंळपणे मान्य केलं. '१०० व्या शतकाचा माझ्यावर दबाव नक्कीच होता', 'महासेंच्युरीनंतर तणावमुक्त झाल्यासारखं वाटतं आहे', असं म्हणत सचिनने एक सुटकेचा निश्वास टाकला. पण त्याच बरोबर सचिनने स्पष्ट केले की, रेकॉर्ड हे मोडण्यासाठी असतात. त्यामुळे माझा १०० शतकांचा रेकॉर्ड जर मोडला गेला तर तो एका भारतीय खेळाडूने मोडावा अशी माझी इच्छा असेल. 'महाशतक हे काही स्वप्न नव्हतं',  'वर्ल्डकप जिंकणं हे स्वप्न होतं', 'वर्ल्डकपसाठी मी २२ वर्ष वाट पाहिली'. 

 

सचिनला कुटुंबानी आणि मित्रांनी कशी साथ सोबत केली?

 

'टीमचा विजय माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचा आहे',  'इंडियन टीमची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे'. 'टीम इंडिया अव्वल स्थानावर लवकरच येईल', 'इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौरा अत्यंत खडतर होता', असं म्हणतं सचिनने त्याच्या कुटुंबाचे त्याच्या मित्रांचे आणि चाहत्यांचे आभार मानले. पण त्याचसोबत त्यांनी दिलेली साथ ही फार उपयोगी होती हे देखील त्याने स्पष्ट केले. 'मी महाशतक करून घरी आलो तेव्हा मित्रांनी दिलेली पार्टी एक छान सरप्राईज होतं'. 'महाशतक झाल्यानंतर कुटुंबियांनी गोव्यात सेलिब्रेशन केलं.' 'चाहत्यांचे आशिर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत', 'माझे कुटुंबिय आणि मित्र आम्ही कधीच क्रिकेटवर बोलत नाहीत', 

 

मला कोणालाही काहीही करून दाखवण्याची गरज नाही - सचिन