अहमदाबादमध्ये विंडिजला करतील का ‘बाद’?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियाने २-० नं आघाडी घेतली. आता अहमदाबाद वन-डेमध्ये भारताला ३-० अशी विजयी आघाडी घेण्याची नामी संधी आहे. यंगिस्तान तुफान फॉर्ममध्ये आहे.

Updated: Dec 4, 2011, 02:07 PM IST

झी २४ तास वेब टीम, अहमदाबाद

 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियाने २-० नं आघाडी घेतली. आता अहमदाबाद वन-डेमध्ये भारताला ३-० अशी विजयी आघाडी घेण्याची नामी संधी आहे. यंगिस्तान तुफान फॉर्ममध्ये आहे. युवाब्रिगेड विजयामध्ये निर्णायक भूमिका बजावते आहे. विंडिजच्या टीमला अपेक्षेप्रमाणे कामगिरी अजूनही करता आलेली नाही. आता तिसरी वन-डे जिंकण्यासाठी विंडिजची टीम प्रयत्नशील असेल.

 

वीरेंद्र सेहवागची यंगिस्तान मॅचविनिंग कामगिरी करतेय. गेल्या दोन वन-डेमध्ये युवा ब्रिगेडच्या जोरावरच भारताला विंडिजवर मात कण्यात यश आलं आहे. आता तिसरी वन-डे अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर रंगणार आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाच फेव्हरिट असणार आहे. भारतीय टीम सांघिक कामगिरी करत विजय मिळवतेय. त्यामुळे भारताला पराभूत करणे विंडिज टीमला चांगलच कठीण जाणार आहे.

 

सेहवागच्या नेतृत्वाखाली टीमल चांगली कामगिरी करते. मात्र, सेहवागच्या फॉर्मची चिंता सध्या चांगलीच सतावते. सेहवागला फारशी कमाल करता आलेली नाही. त्यामुळे या मॅचमध्ये याची कसर भरुन काढण्याच आव्हान त्याच्यासमोर असेल. वीरुबरोबरच त्याचा दिल्लीकर सहकारी गौतम गंभीरही फ्लॉप ठरलाय.

 

एकीकडे यंगगन्स मॅचविनिंग कामगिरी करतेय. मात्र या सिनियर्सना लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मिडल ऑर्डरमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा टीमसाठी मॅचविनरची भूमिका बजावतायत. रोहितनं तर बॅक दू बॅक हाफ सेंच्युरीज ठोकल्या आहेत. त्यामुळे या मॅचमध्ये आपली सेंच्युरी झळकावण्यास तो आतूर असणार आहे.

 

बॉलर्स तर विजयामध्ये मोला वाटा उचलतायत. उमेश यादव, वरुण यादव आणि विनय कुमार ही फास्ट बॉलर्सची तिकडी विंडिज बॅट्समनवर चांगलीच भारी पडली आहे. आर. अश्विन अपेक्षेप्रमाणे विंडिजसाठी धोकादायक ठरतोय.

 

विशाखापट्टणम वन-डेत बॉलर्सना मात्र विंडिजची अखेरची विकेट घेण्यात अपयश आलं. होतं. रवि रामपॉल भारतासाठी चांगलीच डोकेदुखी ठरला होता. डॅरेन ब्राव्होचा फॉर्म विंडिजसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सीरिजमध्ये पहिला विजय मिळविण्यासाठी डॅरेन सॅमीची टीम प्रयत्न करणार आहे. आता विंडिजची टीम भारताला रोखण्यात यशस्वी ठरते का ? ते पाहण महत्त्वाच ठरणार आहे.