मास्टर ब्लास्टरला खेळायची वन डे सिरिज

सचिन तेंडुलकरच्या शंभराव्या सेंच्युरीची प्रतीक्षा अवघ्या क्रिकेटविश्वाला गेल्या आठ महिन्यांपासून आहे. आता सचिन वेस्ट इंडिजविरुद्धच्या उर्वरित दोन वन-डे मॅचेसही खेळण्याची दाट शक्यता आहे.

Updated: Dec 4, 2011, 01:46 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

सचिन तेंडुलकरच्या शंभराव्या सेंच्युरीची प्रतीक्षा अवघ्या क्रिकेटविश्वाला गेल्या आठ महिन्यांपासून आहे. आता सचिन वेस्ट इंडिजविरुद्धच्या उर्वरित दोन वन-डे मॅचेसही खेळण्याची दाट शक्यता आहे.

सचिननं उर्वरित वन-डे खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता सचिनच्या महासेंच्युरीची उत्सुकता आणखी वाढली आहे. टेस्टमध्ये सचिनला शंभराव्या सेंच्युरीनं हुलकावणी दिली होती. त्यामुळे वन-डे सीरिजमध्ये तो याची कसर भरुन काढण्यासाठी आतूर आहे.

अहमदाबादमध्ये उर्वरित दोन वन-डेसाठी भारतीय टीमचं सिलेक्शन होणार आहे. त्यावेळी याची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय.

 

 

Tags: