www.24taas.com, क्वालालंपुर
क्रिकेटच्या सर्वोच्च समितीच्या (आयसीसीचे) अध्यक्ष शरद पवार यांचा आयसीसी अध्यक्ष पदाचे आता काहीच दिवस उरले आहेत. पुढच्याच आठवड्यात शरद पवारांचा कार्यकाळ संपणार आहे. आणि त्यानंतर न्युझीलंडचे एलेन इसाक हे आयसीसीचे नवे अध्यक्षपदाची धुरा संभाळतील. आयसीसीने आज जाहीर केले की, इसाक हे शरद पवारांच्या जागी अध्यक्षपद संभाळतील.
दोन वर्षानंतर शरद पवारांचा कार्यकाळ संपला आहे. आयसीसी परिषदेची २८ जूनला होणारी बैठकीमध्ये औपचारिकरित्या याची घोषणा करण्यात येईल. २०१४ पर्यंत इसाक हे आयसीसचे अध्यक्ष असणार आहेत. शरद पवार यांनी आपल्या कार्यकाळात अध्यक्ष पदाची धुरा अगदी समर्थपणे सांभाळली.
शरद पवार अध्यक्ष असतानाचा भारताने वर्ल्डकप जिंकण्याची किमया केली होती. शरद पवार यांच्याप्रमाणेच आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणार हरून लोगार्ट यांचा उत्तराधिकारी म्हणून डेव्हिड रिचर्डसन यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.