www.24taas.com, लंडन
जॉयदीप कर्माकरनं 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात फायनल्या शर्यतीत आहे. जॉयदीपनं फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केल्यास त्याच्याकडून मेडलच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जॉयदीपनं क्वालिफायमध्ये शानदार कामगिरी केली आहे
फायनलमध्ये प्रवेश
विजय कुमारनं 25 मीटर एअर पिस्तलच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. विजयनं क्वालिफाय राऊंडमध्ये शानदार कामगिरी केली. आता फायनलमध्येही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
भारताचा अव्वल बॉक्सर विजेंदर सिंगनं क्वार्टर फायनलमध्ये धडाक्यात प्रवेश केला आहे. 75 किलो वजनीगटात त्यानं अमेरिकेच्या टेरेल गौशाला 16-15 नं पराभूत केलं. अतिशय रंगतदार झालेल्या या लढतीमध्ये विजेंदरनं बाजी मारली. विजेंदरनं सुरुवातीपासूनचं मॅचवर आपली पकड मजबूत करायला सुरवात केली. मात्र, दुस-या राऊंडमध्ये अमेरिकन बॉक्सरनं जोरदार कमबॅक केलं. त्यानंतर विजेंदरनं टेरेलला कुठलीही संधी दिली नाही. आणि शानदार विजय मिळवला. आता क्वार्टर फायनलमध्ये त्याला उझबेकिस्तानच्या बॉक्सरचा सामना करावा लागणार आहे.
गगन अपयशी
गगन नारंग 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात क्वालिफाय करण्यात अपयशी ठरला आहे. नारंग 593 पॉईंट्ससह 17 व्य़ा नंबरवर फेकला गेला. नारंगकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र तो फायनलमध्ये प्रवेश करु शकला नाही. नारंगनं 10 मीटर रायफलमध्ये ब्राँझ मेडलची कमाई केली होती. त्यामुळे सा-यांच्या नजरा त्याच्यावरच होत्या. मात्र तो क्रीडाप्रेमींच्या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही.
ऑलिम्पिक बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल सेमीफायनलमध्ये पराभूत झाली आहे. चीनच्या यिहान वँगनं सायनाचा 21-13, 21-13 नं पराभूत केलं. या मॅचमध्ये वँगच्या धडाक्यापुढे सायनाचं काहीच चालल नाही. या पराभूवामुळे सायना वँगविरुद्ध झालेल्या सहाही मॅचमध्ये पराभूत झाली आहे. सायना पराभूत झाली असली तरी, तिची ऑलिम्पिकमध्ये मेडलची दावेदारी कायम आहे. सायनाची ब्राँझ मेडलची मॅच शनिवारी होणार आहे.