रूनीची मानहानी, बेटिंग केले बापानी

मॅनचेस्टर युनायटेडचा स्टार फुटबॉलपटू वेन रूनीचे वडील आणि काका यांना बेटिंग प्रकरणी अटक करण्यात आलय. स्कॉटीश स्ट्रायकर प्रीमिअर लीग दरम्यान बेटींग करताना रूनीचे ४८ वर्षीय वडील ज्यांच नावंही वेन असू त्याचे ५४ वर्षीय काका रीची रूनी यांना अटक करण्यात आली आहे.

Updated: Oct 9, 2011, 07:26 AM IST

झी 24 तास वेब टीम, इंग्लंड

 

मॅनचेस्टर युनायटेडचा स्टार फुटबॉलपटू वेन रूनीचे वडील आणि काका यांना बेटिंग प्रकरणी अटक करण्यात आलय. स्कॉटीश स्ट्रायकर प्रीमिअर लीग दरम्यान बेटींग करताना रूनीचे ४८ वर्षीय वडील ज्यांच नावंही वेन असू त्याचे ५४ वर्षीय काका रीची रूनी यांना अटक करण्यात आली आहे.

 

रूनीचे वडील आणि काका यांच्यासह इतर ७ जणांना बेटिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. स्ट्रायकर प्रीमिर लीग दरम्यान लिव्हरपूल इथंल्या आपल्या घरी रूनीचे वडील, काका आणि इतर ७ जण बेटिंग करत असताना पोलिसांनी त्यांना अटक केले. अटक करण्यात आल्यानंतर रूनीच्या वडील आणि काकासहित इतर सात जणांना जामिनावर सोडून देण्यात आलं आहे. रूनी सध्या मॉन्टेनेग्रो इथं होणाऱ्या युरोपयिन चॅम्पियनशीप क्वालीफाईंग मॅचकरता रवाना झाला आहे.

 

वेन रूनी म्हटलं की सर्वांच्या नजरेसमोर येतो तो मॅन्यूकडून खेळताना होणारी मैदानावर गोल्सची बरसात.. रूनीने आपल्या चपळ आणि वेगवान खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्धी टीम्ससमोर कडवी आव्हानं उभं करत सळो की पळो करून सोडलं खरं. पण त्याचे वडील वेनरूनी सिनियर आणि काका रिची रूनी यांना फुटबॉल मॅचवर बेटिंग केल्याप्रकरणी अटक झाल्यामुळे सध्या स्टार स्ट्रायकर रूनीची अवस्था मैदानावर प्रतिस्पर्धी टीमची होते तशीच काहीशी  झाली आहे.

 

[caption id="attachment_1971" align="alignleft" width="300" caption="रूनीची मानहानी"][/caption]

मॅन्चेस्टर युनायटेडचा स्टार स्ट्रायकर वेन रूनीने वयाच्या १०व्या वर्षी प्रोफेशनल फूटबॉलमध्ये पदार्पण करत एव्हर्टनच्या यंग टीमचं प्रतिनिधित्व केलं. आयरिश-कॅथलिक कुटुंबात जन्मलेल्या वेन रूनीचा आयडॉल होता तो डंकन फ्लेचर. लहानपणापासूनच फुटबॉलकडे कल असणाऱ्या वेन रूनीने आपल्या परफॉर्मन्सच्या जोरावर प्रीमिअर लीगमध्ये गोल नोंदवणारा सर्वात यंग फुटबॉलर असा मान त्याने मिळवला. प्रीमिअर लीगमध्ये खेळलेल्या ३३ मॅचेसमध्ये त्याने ६ गोल्स झळकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. बीबीसी स्पोर्टसनीही रूनीची 2002 मध्ये ‘यंग पर्सनॅलिटी ऑफ द ईयर’ अशी निवड केली.

 

रूनीच्या मैदानावरील या बेधडक खेळीमुळे त्याच्या फॅन्सच्या संख्येत सातत्याने वाढ होत राहिली. चपळ हालचाल आणि वेगामुळे त्याला मैदानावर रोखणं हे प्रतिस्पर्धी टीम करता कठीणअसं आव्हान होतं. त्याच्या याच परफॉर्मन्समुळे इंग्लंडच्या फुटबॉल क्षितिजावर  रूनीचा उदय झाला. वयाच्या 17व्या वर्षी इंग्लंडच्या राष्ट्रीय टीममध्ये स्थान मिळवणारा सर्वात यंग प्लेयरचा बहुमानही रूनीलाच मिळाला. अनेक दैदिप्यमान आणि संस्मरणीय विजय मिळवून देतयशाच्या शिखरावर पोहोचलेल्या रूनीच्या नशिबी अपयश आणि कुप्रसिध्दीही आली.

 

आतापर्यंत मॅन्यूकडून खेळताना एकहाती विजय मिळवून देणाऱ्या रूनीला मात्र राष्ट्रीय टीममधून खेळताना लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशच आलं आहे.  अशातच त्याचे वडील वेन रूनी सिनीयर आणि त्याचे  काका रिची रूनी यांना मेरीसाईड पोलिसांनी स्कॉटिश प्रीमिअर लीग मॅचवर बेटिंग करत असल्याचा आरोप करत अटककेल्याने रूनीलाही धक्का बसला. 2012 युरो कप टूर्नामेंटच्या क्वालीफायर राऊंडकरता रूनीसध्या मॉन्टेनेग्रो इथं गेला आहे वडिलांना आणि काकांना झालेल्या अटकेनंतर रूनीने प्रयत्न करून आपल्या वकीलांकरवी जामीन मिळवून दिला खरा. पण जोपर्यंत बेटिंगच्या आरोपांचा निकाल लागत नाही तोपर्यंत वेन रूनी सिनियर यांना इन्वेस्टीगेटींग टीमसमोर हजर राहावं लागणार आहे.