यांची भाडंण संपणार कधी? पदक जिंकणार कधी?

लंडन ऑलिम्पिककरता सर्व देश जोरदार तयारीला लागलेलं असताना, भारतीय टेनिस संघटना मात्र खेळाडूंमधले वाद मिटवण्यात गुंतलेली दिसते. लंडन ऑलिम्पिककरता महेश भुपती आणि रोहन बोपन्ना या दोघांनीही मेन्स डबल्स इव्हेंटमध्ये भारतीय टेनिस स्टार लिएंडर पेससह खेळण्यास नकार दिला.

Updated: Jun 20, 2012, 01:39 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

लंडन ऑलिम्पिककरता सर्व देश जोरदार तयारीला लागलेलं असताना, भारतीय टेनिस संघटना मात्र खेळाडूंमधले वाद मिटवण्यात गुंतलेली दिसते. लंडन ऑलिम्पिककरता महेश भुपती आणि रोहन बोपन्ना या दोघांनीही मेन्स डबल्स इव्हेंटमध्ये भारतीय टेनिस स्टार लिएंडर पेससह खेळण्यास नकार दिल्याने वादळ उठलं होतं ते अजुनही शमण्याची चिन्ह दिसतं नाही.

 

त्यामुळे टेनिस संघटना २१ जूनपुर्वी ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या टीमचं नाव फायनल करण्यात गुंतली आहे. तशातच भारतीय टेनिस संघटनेने एकच टीम पाठवण्याच्या निर्णयावर क्रीडा मंत्री अजय माकन यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर, आता टेनिस संघटना ऑलिम्पिकच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेईल असं मत व्यक्त केलं.

 

टेनिस संघटनेच्या निर्णयात हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला. ऑलिम्पिककरता कोणती टीम पाठवावी याचे पर्याय भारतीय टेनिस संघटनेने क्रीडा मंत्रालयाला पाठवले असून, टेनिस संघटनेने लिएंडर पेसला पाठिंबा दर्शवला आहे..