ऑलिम्पिकमध्येही सुरू झाली फिक्सिंग

ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनवर फिक्सिंगचे आरोप केले जातायत. चीन, दक्षिण कोरिया आणि इंडोनेशियाच्या आठ बॅडमिंटनपटूंवर हे आरोप करण्यात येत आहेत.

Updated: Aug 1, 2012, 03:57 PM IST

www.24taas.com, लंडन

ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनवर फिक्सिंगचे आरोप केले जातायत. चीन, दक्षिण कोरिया आणि इंडोनेशियाच्या आठ बॅडमिंटनपटूंवर हे आरोप करण्यात येत आहेत.

चीनच्या यु वँग आणि वँग झियोली तर दक्षिण कोरियाच्या ज्युंग क्युंग यून आणि किम हाना यांच्यावर फिक्सिंगचे आरोप लावण्यात आले आहेत. चीन आणि दक्षिण कोरियन टीम मॅच जाणून-बुजून मॅच गमावण्याचा प्रयत्न करत होते. चीनची टीम आपल्या नंबर दोन टीमला फायनलपर्यंत सामना होऊ नये यासाठी प्रयत्न करत होत्या.

अखेर ही मॅच दक्षिण कोरियानं जिंकली. चीन आणि दक्षिण कोरियाच्या बॅडमिंटनपटूंबरोबरच इंडोनेशियन प्लेअर्सही यामध्ये सहभागी असल्याची चर्चा आहे. आणि याप्रकरणी चौकशीही सुरु करण्यात आली.