भारतात चेस ख-या अर्थानं लोकप्रिय केल ते विश्वनाथन आनंदन.. भारतात चेसची कल्पना आनंद शिवाय होऊच शकत नाही. चेसमधला तीन वेगवेगळ्या फॉर्म्याट अर्थात नॉकआऊट, टूर्नामेंट आणि मॅच या तिन्ही प्रकारात अजिंक्यपद पटकावणारा पहिला बुद्धिबळपटू असा आनंदचा लौकिक आहे. आणि यामुळेच तो चेस मधला महान प्लेअर ठरलाय. विश्वनाथन आनंदनं चाळीशीत पाचव्यांदा वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकण्याची किमया साधली. आनंदची ही कामगिरी भारतासाठी निश्चितच अभिमानास्पद अशीच म्हणावी लागणार आहे. चाळीशीतही त्याची भारताचा तिंरगा बुद्धीबळाच्या जगतामध्ये डौलानं फ़डकावण्याची इच्छा तसूभरही कमी झालेली नाही. त्याच्या या प्रबल इच्छा शक्तीला सलामच ठोकावा लागणार आहे.
चेसच्या इतिहासातल्या फिडे क्रमवारीत 2800 पॉईंट्स मिळवणा-या चार चेस प्लेअर्समध्ये आनंदचही नाव आहे. यावरुनच आनंद चेसचा बेताज बाहशाह असल्याच स्पष्ट होत. आनंद फिडे चेस चॅम्पियनशिप 2000 ते 2002 पर्यंत सलग जिंकली. वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच अजिंक्यपद जेव्हा 2 ग्रुप्समध्ये विभागण्यात आलं तेव्हा त्यानं या दोन्ही फॉर्म्याटमध्ये देखिल आपणच बादशाह असल्याच दाखवून दिलं. त्यामुळे 2007मध्ये चेस जगतावर त्यानं आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल. 2008मध्ये देखिल आनंदने व्लादमिर कामलिक्ला पराभूत करत आपल विश्व विजेतेपद कायम राखलं. विश्वनाथन आनंदला चेसच बाळकडू मिळालं ते त्याच्या आईकडून. 1988मध्ये आनंदन जुनिअर चेस चॅम्पियनशिप जिंकली याच वर्षी भारताचा पहिला ग्रँडमास्टर बनन्याचा मान त्यान मिळवला.
1988मध्ये आनंदला चेस मधील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कारान सन्मानित करण्यात आल. मित्रपरिवारात विशी नावाने ओळखल्या जाणा-या आनंदन त्यानंतर मागे वळून पाहिलच नाही. आनंदच्या चेस जगतातील दबदब्यामुळे त्याने चेस फिडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली. 1996 ते जुलै 2008 दरम्यान तो फिडे रँकिंगमध्ये सातत्याने अग्रभागी असलेल्या चेस प्लेअर्सशी स्पर्धा करत होता. 2007मध्ये आनंदन सगळ्या स्पर्धांत अजिंक्यपद पटकावलं. शिवाय तो चेसमधल्या सगळ्या रँकिंगमध्ये टॉपवर पोहोचला. त्यानंतर आनंदकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या. मात्र ऑक्टोबर 2008 मध्ये तो फिडे रँकिंगमध्ये पहिल्यांदाच पाचव्या स्थानी फेकला गेला. 1996 नंतर पहिल्यांदाच त्याला पहिल्या तीन चेस प्लेअर्समध्ये स्थान पटकावण्यास अपयश आलं होतं.
आनंदच्या करिअरला उतरती कळा लागलीय अस वाटत असतानाच त्यान मॅगनस कार्सेनला पराभूत करत मीनाझ 2008 सुपर टूर्नामेंट चॅम्पियनशिप जिंकली. त्याच्या करिरमधलं हे अकराव अजिंक्यपद ठरलं. त्याच प्रमाणे आनंदन सलग तीन वेळा एडवांस चेस टूर्नामेंटची अजिंक्यपद पटकावली. त्यान लिऑन आणि स्पेनमध्ये हे विजेतेपद पटकावलं. आनंदच्या विजयी धडाक्यामुळेच 1997-98-99 तसचं 2004-2007 आणि 2008 यावर्षी त्यान चेस मधला सर्वोत्तम पुरस्कार अर्थात चेस ऑस्कर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवला. रशियन सद्दी असलेल्या चेसमधील सत्ता मात्र आनंदमुळे भारताकडे कायम आहे. 2010 मध्येही त्यानं वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिकंली होती. त्यानंतर 2012 मध्ये त्यानं पाचव्यांदा वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकली आहे. 2014 पर्यंत आनंदकडे वर्ल्ड चॅम्पियनशिप कायम रहाणार आहे. वयाच्या 42 व्य़ा वर्षी त्याने हा विक्रम केलाय. यावरूनच 64 घरांच्या या अनभिषिक्त सम्राटाची महानता सिद्ध होते.