व्हिटामिनने होतो गर्भधारणेत फायदा

एका नव्या अभ्यासातून सिद्ध झालंय की स्त्रियांना व्हटामिनच्या सेवनामुळे गर्भधारणेसाठी फायदा होऊ शकतो. ज्या स्त्रियांनी गर्भधारणेशी संबंधित व्हिटामिनच्या गोळ्या घेतल्या त्या स्त्रियांच्या गर्भधारणेची शक्यता गोळ्या न घेणाऱ्या स्त्रियांपेक्षा दुप्पट वाढली.

Updated: Dec 24, 2011, 08:31 PM IST

झी २४ तास वेब टीम, लंडन

 

व्हिटामिनच्या नियमित सेवनाने खूप फायदा होतो. एका नव्या अभ्यासातून सिद्ध झालंय की स्त्रियांना व्हटामिनच्या सेवनामुळे गर्भधारणेसाठी फायदा होऊ शकतो.

 

 अनिवासी भारतीय शास्त्रज्ञ डॉ. रीना अग्रवाल यांच्या हाताखाली अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी हा प्रयोग करून पाहिला. आता हाच प्रयोग मोठ्या प्रमाणावर करून पाहाणार आहेत. या अभ्यासातून एक समजलं की ज्या स्त्रियांनी गर्भधारणेशी संबंधित व्हिटामिनच्या गोळ्या घेतल्या त्या स्त्रियांच्या गर्भधारणेची शक्यता गोळ्या न घेणाऱ्या स्त्रियांपेक्षा दुप्पट वाढली.

 

 रिप्रोडक्टिव्ह बायोमेडिसिन ऑनलाइननुसार या प्रयोगात ५८ स्त्रियांचा अभ्यास केला गेला. त्यासाठी त्यांचे दोन गट केले. एका गटाला व्हिटामिनच्या गोळ्या दिल्या गेल्या तर दुसऱ्या गटाला या गोळ्यांपासून दूर ठेवण्यात आलं. सर्वच स्त्रियांना सकस, पौष्टिक आहार दिला गेला. त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला की ज्या स्त्रियांना व्हिटामिनच्या गोळ्या दिल्या, त्या स्त्रिया गर्भधारणेसाठी अधिक सक्षम बनल्याचं दिसून आलंय.