www.24taas.com, लंडन
‘एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते,’ आठवतोय का हिंदी सिनेमातला हा डायलॉग... हेच वाक्य आता पुराव्यानिशी सिद्ध केलंय लंडनच्या संशोधनकर्त्यांनी... पण, याचं कारण मात्र पुरुष आहेत.
कोणताही पुरुष हा एखाद्या महिलेचा 'फक्त मित्र' कधीच असू शकत नाही, असं या संशोधनकर्त्यांचं म्हणणं आहे. पुरुष महिलांशी मैत्री करतात त्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे लैंगिक आकर्षण... म्हणूनच पुरुष महिलांशी फक्त मैत्रिचे संबंध कधीच ठेऊ शकत नाही. तर याच्या विरुद्ध महिलांचं असतं. म्हणजेच, महिला आपल्या पुरुष मित्राबरोबरची आपली मैत्री निर्हेतूक भावनेनं घेतात. जेव्हा महिलांचं स्वत:च जीवन आणि संबंध अस्थिर असतात, अशाच वेळी महिला एखाद्या पुरुषाबद्दल पुढचा विचार करतात, असं या संशोधनकर्त्यांचं म्हणणं आहे.
या सर्वेक्षणात ८८ तरुण जोडप्यांना सहभागी करण्यात आलं होतं. यावेळी पुरुष विवाहीत असो वा नसो पण आपल्या मैत्रिणींबद्दल त्यांच्या मनात थोडं तरी लैंगिक आकर्षणाची भावना होतीच. सोबतच अगोदरपासूनच संबंधात असलेल्या महिला किंवा एकट्या महिलांमध्येही या भावना आढळून आल्या. पण, ज्या महिला अगोदरपासूनच कुणाबरोबर तरी संबंधात आहेत आणि त्यांचे हे संबंध अस्थिर आहेत, अशाच महिला पुरुष मित्रांकडे आकर्षित झालेल्या आढळून आल्या. अगोदरपासूनच संबंधांमध्ये अडकलेल्या महिला मात्र इतर पुरुषांकडे फारच कमी लक्ष देतात, असं संशोधनकर्त्यांना आढळून आलं. ‘पर्सनल रिलेशनशिप’ या पत्रिकेत हे संशोधन प्रकाशित करण्यात आलंय.
.