www.24taas.com, वॉशिंग्टन
फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर आपले विचार मांडल्यावर किती बरं वाटतं? शास्त्रज्ञांच्या एका अभ्यासावरून असं सांगण्यात आलंय की सोशल नेटवर्कींग साईट्सवर आपले विचार मांडल्यावर उत्तम जेवण किंवा सेक्स केल्यावर जेवढं वाटतं तेवढं बरं वाटतं.
दोन शास्त्रज्ञांनी या संदर्भात अभ्यास केला आहे आणि त्यातून काही निष्कर्ष काढले आहेत. सोशल नेटवर्किंग मीडियावर व्यक्त होताना व्यक्तीच्या मेंदूमध्ये एक प्रकारचं रसायन तयार होत असतं. या तयार होणाऱ्या रसायनामुळे आनंद मिळतो..
शास्त्रज्ञांच्या मते सेक्स करताना किंवा चविष्ट जेवण जेवताना या प्रकारचा आनंद मिळतो. याच कारणामुळे सोशल नेटवर्किंग साईट्सवर लोकांचा ओढा वाढतो आहे. त्यांना त्यांच्या नकळत अशा प्रकारचा आनंद मिळत असतो.