सव्वा लाखांची बजाज RE - 60 'लाजवाब'

बजाजची RE - 60 या कारचा बोलबोला गेले अनेक दिवसांपासून सुरू होणार होता नॅनो कारच्या धर्तीवर बजाजने ही स्मॉल कार बाजारात आणली आहे. टाटांच्या नॅनोला टक्कर देण्यासाठी बजाजनं आता एक नवी कार प्रदर्शित केली आहे.

Updated: Jan 3, 2012, 03:11 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

बजाजची RE - 60 या कारचा बोलबोला गेले अनेक दिवसांपासून सुरू होणार होता नॅनो कारच्या धर्तीवर बजाजने ही स्मॉल कार बाजारात आणली आहे. त्यामुळे या कारबाबत अनेकांना उत्सुकता लागली होती ती कार आज प्रदर्शित करण्यात आली आहे.

 

टाटांच्या नॅनोला टक्कर देण्यासाठी बजाजनं आता एक नवी कार प्रदर्शित केली आहे. बजाजच्या या नव्या स्मॉल कारचे नाव RE 60  असं असून त्याची कारची किंमत सव्वालाखाच्या आसपास आहे. या कारने प्रदर्शनापुर्वीच कारमार्केटमध्ये आपली जबरदस्त हवा निर्माण केली आहे. ही कार एका लिटरमागे ३० किमी. माईलेज देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. तसंच ही कार तासाला ९० किमी पेक्षा अधिक वेगानं धावू शकणार नाही.

 

बजाज कंपनीन आतापर्यंत अनेक दर्जेदार टू व्हिलर आणि थ्री व्हिलर वाहनं दिली आहेत. आता या कारच्या निमित्तानं फोरव्हिलरच्या निर्मितीत बजाजनं उडी घेतली आहे. बजाजच्या या नव्या कारचं सात जानेवारीला आता दिल्ली इथं होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये कर्मशियल लाँच होणार आहे. कार प्रदर्शित व्हायला अजून चार दिवस असले तरी गेल्या काही दिवसात आगाऊ नोंदणीचा नवा विक्रम RE 60  ने केला आहे. चौदा लाखाची वाहनाची नोंदणी झाल्याने सा-या कार जगताचे लक्ष आता RE 60 कडे लागलय..