वाढतं तापमान कमी करतंय उंची

ग्लोबल वॉर्मिंगमुळे मानवाची उंची कमी होऊ शकते. शास्त्रज्ञांनी सुमारे पाच कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पहिल्या घोड्यांची उत्पत्ती आणि त्यांच्या विकासावर घडणारा परिणाम यांचा अभ्यास करून हा इशारा दिला आहे.

Updated: Feb 27, 2012, 11:39 AM IST

www.24taas.com, लंडन

ग्लोबल वॉर्मिंगमुळे मानवाची उंची कमी होऊ शकते. शास्त्रज्ञांनी सुमारे पाच कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पहिल्या घोड्यांची उत्पत्ती आणि त्यांच्या विकासावर घडणारा परिणाम यांचा अभ्यास करून हा इशारा दिला आहे.

फ्लोरिडा आणि नेब्रास्का युनिव्हर्सिटीच्या एका ग्रुपने जगातील शेवटच्या तापमानवाढीचा संबंध घोड्यांशी लावून पाहिला. पाच कोटी ६० लाख वर्षांपूर्वी असणाऱ्या जगातील पहिल्या घोड्यांच्या उत्पत्तीपासून त्यांच्या उत्क्रांतीचा अभ्यास केला. यासाठी त्यांच्या जीवाश्मांचा अभ्यास केला.

फ्लोरिडा निसर्ग विज्ञान संग्रहालयाचे वक्ते डॉ. जोनाथन ब्लोच यांनी सांगितलं की, जसजसं तापमान वाढत गेलं तसता घोड्यांचा आकार कमी कमी होत गेला. आणि भविष्यातल्या वाढत्या तापमानाच्या चाचणीवर तपासल्यावर पाहिलं तेव्हा घोडे मांजरीच्या आकाराएवढे झाले.

शास्त्रज्ञांच्या मते सध्याच्या हवा पाण्यातला बदल सस्तन प्राण्याचंमध्ये बदल घडवत आहे. याचा प्रभाव मनुष्यावरही होणारच. मानवाची उंचीही यामुळे कमी होऊ शकते. परंतु घटत्या उंचीमागे वाढतं तापमान हे एकच कारण आहे की आणखी काही खारणं आहेत, हे अजून शास्त्रज्ञांना समजलेलं नाही.