टीव्ही उद्योगाच्या वाढीसाठी पहिला 'टीव्ही फेस्ट'

‘टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स’ची संस्था ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन’ आता दरवर्षी टेलिव्हिजन फेस्टचे आयोजन करणार आहे. या माध्यमातून देश-विदेशातल्या टेलिव्हिजन जगताशी जोडलेल्या सर्व संस्थां एका व्यासपीठावर येणार आहेत.

Updated: Aug 3, 2012, 08:59 AM IST

कुमार कार्तिकेय, www.24taas.com, नवी दिल्ली

 

‘टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स’ची संस्था ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन’ आता दरवर्षी टेलिव्हिजन फेस्टचे आयोजन करणार आहे. या माध्यमातून देश-विदेशातल्या टेलिव्हिजन जगताशी जोडलेल्या सर्व संस्थां एका व्यासपीठावर येणार आहेत. या कार्यक्रमात टेलिव्हिजन उद्योगाची प्रगती आणि आव्हानं यावर चर्चा होणार आहे.

 

सिनेमा आणि जाहिरात क्षेत्राशी संबंधित वेगवेगळे फेस्टिव्हल दरवर्षी आयोजित करण्यात येतात. आता याच धर्तीवर इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशन देशात पहिल्यांदाच इंडियन टीव्ही फेस्टिव्हल सुरु करणार आहे. गोव्यात दरर्षी भरणा-या या फेस्टिव्हलच्या माध्यमातून जगभरातल्या टेलिव्हिजन जगताशी संबंध असणा-या लोकांना एका मंचावर आणण्याचा इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशनचा मानस आहे.. त्यामुळं टेलिव्हिजन उद्योग क्षेत्रातील व्यक्तींमध्ये विचारांची देवाणघेवाण होऊन बदलत्या युगात कार्यक्रमात नाविन्य आणण्याबाबत एकमत होईल.

 

अमेरिका आणि चीननंतर भारत टेलिव्हिजन उद्योगासाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. देशात 600 टेलिव्हिजन चॅनल असून दररोज कार्यक्रमांच्या माध्यामातून टेलिव्हिजन ५० कोटी जनतेपर्यंत पोहचतो. गेल्या ५ वर्षात या उद्योगाची सरासरी वाढ १२ टक्के राहिली आहे.. 2011 पर्यंत या क्षेत्रातील कमाई 33 हजार कोटी रुपये इतकी होती, तर तीच २०१७ पर्यंत एक लाख कोटी पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. इंडियन टेलिव्हिजन फेस्टिव्हलमुळे जगभरातील टेलिव्हिजन उद्योगाचा बदलता ट्रेंड कळण्यास मदत होणार आहे.

 

यावर्षी २ आणि ३ नोव्हेंबरला इंडियन टेलिव्हिजन फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलंय.. यांत, झी एंटरटेन्मेंट वॉल्ट डिजने, सोनी कॉर्पोरेशन, इंटरनॅशनल न्यूज कॉ़र्पोरेशन आणि चॅनल ४ सारखे दिग्गज ब्रॉडकास्टर्सचा सहभाग असणार आहे...या फेस्टिव्हलमुळे भारतीय टेलिव्हिजनचा कंटेट दुस-या देशांमध्ये पोहचवण्यास मदत होणार आहे.