कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये रोबोट

मुंबईमधील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये आता रोबोटच्या मदतीने शस्त्रक्रिया केल्या जातील. हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने रविवारी यासंदर्भात माहिती दिली.

Updated: Jun 21, 2012, 01:17 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईमधील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये आता रोबोटच्या मदतीने शस्त्रक्रिया केल्या जातील. हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने रविवारी यासंदर्भात माहिती दिली. मुंबईतील वांद्रे या उपनगरीय भागातील एश्यन हार्ट इंन्स्टिट्यूटमध्ये ही सुविधा आहे.

 

रविवारी हॉस्पिटलमध्ये दा विंची रोबोटला अधिकृतरीत्या लोकांसमोर आणलं. जगभरात रोबोटच्या मदतीने होणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये वाढ झाली आहे. रोबोट्सच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केल्यास धोका कमी होतो. या प्रकारच्या रोबोट्समध्ये शस्त्रक्रियेसंबंधित वैद्यकीय शास्त्र आणि तंत्र यांचं प्रोग्रामिंग केलेलं असतं. त्यामुळे अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये चुका होण्याचं प्रमाण कमी असतं.

 

कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक राम नारायण म्हणाले, रोबोट ऑपरेशनमध्ये मदत करतात. स्वतः ऑपरेशन करत नाही. रोबोट स्वतः ऑपरेशन करतात आसा बऱ्य़ाच लोकांचा गैरसमज आहे तसंच रुग्णांनाही भीती असते की मशीन स्वतःहून शस्त्रक्रिया करताना त्याची जबाबदारी कोणावर येते? मात्र, सर्वसामान्य ऑपरेशनच्या वेळी उद्भवणाऱ्या गंभीर समस्यांचं प्रमाण रोबोटच्या सहाय्याने होणाऱ्या ऑपरेशनमध्ये २० टक्क्यांनी कमी होतं.