आयपॅड 2 झाला स्वस्त

नवा आयपॅड लाँच झाल्याबरोबर ऍपलने तात्काळ आयपॅड 2 टॅबलेटच्या किंमतींमध्ये कपात केली आहे. सॅनफ्रिन्सिसको इथे नवा आयपॅड लाँच झाल्याबरोबर आयपॅड 2 च्या किंमतीत १०० अमेरिकन डॉलर्सची कपात केली आहे.

Updated: Mar 8, 2012, 03:17 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

नवा आयपॅड लाँच झाल्याबरोबर ऍपलने तात्काळ आयपॅड 2 टॅबलेटच्या किंमतींमध्ये कपात केली आहे. सॅनफ्रिन्सिसको इथे नवा आयपॅड लाँच झाल्याबरोबर आयपॅड 2 च्या किंमतीत १०० अमेरिकन डॉलर्सची कपात केली आहे. बाजारपेठेत दाखल होणाऱ्या नवनवीन गॅजेट्सवर नजर ठेवणाऱ्यांसाठी हा मात्र आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

याआधी आयपॅड 2 बाजारात लाँच केल्यानंतर त्याने ओरिजिनल आयपॅडची जागा घेतली होती. आता आयपॅड 2 बाजारपेठेत कमी किंमतीत उपलब्ध असणाऱ्या टॅबलेटच्या स्पर्धेत उतरेल तसंच आयबुक्सच्या माध्यमातून अधिक ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करेल.

 

ऍपलने जारी केलेल्या प्रेस रिलिजमध्ये आयपॅड 2 च्या किंमतीतील कपात तात्काळ लागु करण्यात येणार आहे. आयपॅड 2 च्या 16 जीबी वाय फाय वर्जनची किंमत २४,५०० रुपये तर 16 जीबी आय फाय प्लस 3 जी वर्जनची किंमत ३२,९०० रुपये असेल.

 

नवीन आयपॅड अमेरिकेत १६ मार्च रोजी बाजारपेठेत दाखल होईल. भारतात नव्या आयपॅड लाँचची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मागच्या वर्षी अमेरिकेत आयपॅड 2 लाँच झाल्यानंतर भारतात तो सहा आठवड्यात दाखल झाला होता. आता यावेळेस आयपॅड 2 च्या किंमतीत कपात करण्यात आल्यामुळे त्यापेक्षा कमी कालावधीत नवीन आयपॅडचे वर्जन उपलब्ध होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.