www.24taas.com, होस्टन
जग फेसबुकशिवाय राहू शकेल असे वाटते का? हो तर ते खरं आहे, काही वर्षातच फेसबुक गायब होणार आहे. काय धक्का बसला ना? पण येत्या चार-पाच वर्षात फेसबुक हे नाहिसे होणार आहे मत व्यक्त केलं आहे शेअर बाजारातील तज्ज्ञांनी.
ईराक जॅक्सन यांच्यामते येत्या पाच ते आठ वर्षात फेसबुक मार्केटमधून जाणार आहे, ज्यापद्धतीने याहू मार्केटमधून गायब झालं तसचं फेसबुकसुद्धा दिसेनासे होणार आहे. याहू अजूनही चांगले पैसे कमवते आहे, त्यांचा नफाही होत आहे.. जवळजवळ १३००० हजार नोकर त्यांच्याकडे आजही कार्यरत आहे. पण त्यांच्या शेअरला फक्त १० टक्के महत्व आहे. आणि त्यामुळेच याहू बाजारातून नाहिसं होत आहे.
यापुढे येणारी पिढी मोबाईलमध्ये साऱ्या गोष्टी पाहू शकत असल्याने त्यांचा परिणाम हा फेसबुकला होऊ शकतो असं काही जणाचं मत आहे. जॅक्सन यांच्यामते, फेसबुकच मुल्य हळूहळू कमूी होत जाणार आहे. त्यामुळे फेसबुक बाजारातून नाहीसं होण्याची शक्यता नाकारता येत नाही.काल बाजार बंद होताना फेसबुकच्या शेअरमध्ये २५.८७ इतक्या अमेरिकी डॉलरची तूट आली आहे. सुरवातीला फेसबुकने शेअर बाजारात चांगली कमाई केली होती.