आकाशचे अपग्रेड व्हर्जन त्याच किंमतीत!

जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट आकाशची सुधारीत आवृत्ती त्याच किंमतीत सरकार उपलब्ध करुन देणार आहे. आकाशची निर्मिती आता देशातच करण्यात येणार आहे.

Updated: Feb 20, 2012, 07:11 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 


जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट आकाशची सुधारीत आवृत्ती त्याच किंमतीत सरकार उपलब्ध करुन देणार आहे. आकाशची निर्मिती आता देशातच करण्यात येणार आहे. दूरसंचार आणि मनुष्य बळ विकास मंत्री कपील सिबल यांनी सांगितलं की आकाशचे निर्माते डाटाविंडच्या ऐवजी सरकारने सीडॅक आणि आयटीआय या सरकारी उपक्रमांना टॅबलेटमध्ये अधिक सुधारणा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसंच डाटाविंडमध्ये काही त्रुटी राहिल्याचीही कबुली सिबल यांनी दिली.  आकाश हे संपूर्ण भारतीय बनावटीचे उत्पादन असावं असा सरकारचा आग्रह असल्याचं सिबल यांनी सांगितलं.

 

आकाशमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सीडॅक आणि आयटीआयला सहभागी करुन घेण्यात आलं आहे. आणि आकाश हे खऱ्या अर्थाने भारतीय उत्पादन ठरावं यासाठी सरकारने त्यात लक्ष घातल्याचं ते म्हणाले. आकाशची नवी आवृत्ती आहे त्याच किंमतीत उपलब्ध होईल का? त्यावर कपिल सिबल म्हणाले की अपग्रेडेड आकाशची आवृत्ती त्याच किंमतीत मिळेल अशी आशा आहे. आकाशची सध्याची किंमत २५०० रुपये आहे. नवीन आकाश २०१२ साली बाजारात दाखल होईल. त्याच प्रमाणे स्पर्धेचे स्वागतच आहे आणि मुलांना दर्जेदार टॅबलेट देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.