स्त्री भ्रूण हत्या; राज्य सरकारचं ‘एक पाऊल पुढे’

बेकायदेशीर गर्भलिंगनिदान चाचणी प्रकरणात दोषी आढल्यानं महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने ५ डॉक्टर्सच्या परवान्यांना स्थगिती दिलीय. तर १८ डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Updated: Jun 8, 2012, 05:35 PM IST

www.24taas.com, मुंबई  

 

बेकायदेशीर गर्भलिंगनिदान चाचणी प्रकरणात दोषी आढल्यानं महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने ५ डॉक्टर्सच्या परवान्यांना स्थगिती दिलीय. तर १८ डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य शासनानं घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिलीय.

 

राज्यशासनच्या आरोग्य खात्यातर्फे पुणे येथे एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे. हा अधिकारी कारवाईसाठी पुरावे गोळा करून मेडिकल कौन्सिलला मदत करणार आहे. त्यामुळे कारवाईसाठी होणारी दिरंगाई थांबू शकेल, असा दावा यावेळी सुरेश शेट्टी यांनी केलाय. तसंच आरोग्य महिला बाल विकास आणि पोलीस या खात्यांतर्फे स्त्री भ्रूण  हत्येप्रकरणी एकत्र कारवाई केली जाईल. डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्यास तसा बोर्ड त्यांच्या दवाखान्यावर लावण्यात येईल आणि PCPNDT आणि MPT बाबतच्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येतील, असे काही महत्त्वाचे निर्णय आज राज्य शासनानं घेतलेत.

 

.