विजयादशमीनिमित्त संघ संचलन

दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दसऱ्यानिमित्त संचलन केलं. दसऱ्याच्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हिंदी साहित्यिक नरेंद्र कोहली हे उपस्थित होते. सुरुवातीला शस्त्रांचं पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर स्वयंसेवकांनी सघोष संचलन केलं.

Updated: Oct 6, 2011, 12:52 PM IST

झी २४ तास वेब टीम, नागपूर

दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दसऱ्यानिमित्त संचलन केलं. दसऱ्याच्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हिंदी साहित्यिक नरेंद्र कोहली हे उपस्थित होते. सुरुवातीला शस्त्रांचं पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर स्वयंसेवकांनी सघोष संचलन केलं.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी या कार्यक्रमात संघाच्या गणवेशात पूर्ण वेळ उपस्थित होते.

 

मात्र या कार्यक्रमाच्यावेळी सरसंघचालक मोहन भागवत फारच आक्रमक दिसले. सरकारने भगव्या दहशतवादाबद्दल खूप चर्चा करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते अयशस्वी ठरले, कारण भगवा दहशतवाद अस्तित्त्वातच नाही, असं मोहन भागवत म्हणाले.

या कार्यक्रमात संघाची दिशा ठरवण्याबरोबरच भागवत यांनी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री पी. चिदंबरम, नियोजन आयोगावर जोरदार टीका केली. मात्र त्यांनी कोणाचंही नाव न घेता टीका केली.

पंतप्रधानांच्या बांग्लादेश दौऱ्यावर त्यांनी टीका करताना ते म्हणाले की, आसाममध्ये घुसखोरी करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांकडे पंतप्रधान दुर्लक्ष करत आहेत. पण या घुसखोरीमुळे भारतालाचा त्रास होत आहे. यावेळी त्यांनी गृहमंत्री पी.चिदंबरम आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही लक्ष्य केलं. त्याचबरोबर बिनायक सेन यांना योजना आयोगाच्या एका समितीत स्थान का दिलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मोहन भागवत यांनी गरीबी हटाओ घोषणेची खिल्ली उडवताना योजना आयोगाला टीकेचं लक्ष्य केलं. काँग्रेसच्या खासदारांनी बाहेर येऊन ३२ रुपयांत दिवसाचा खर्च भागवून दाखवावा, तेव्हाच त्यांना गरीबीची खरी व्याख्या कळेल

काश्मीरसाठी चर्चा करणारे हे नक्की कोणाच्या बाजून बोलत आहे यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

भागवत यांनी भाषणाच्या सुरुवातीला योगगुरु रामदेव बाबा यांच्या आंदोलना ज्याप्रकारे दडपण्यात आलं त्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसंच यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात राजबालाचा झालेला मृत्यू याला सरकारच जबाबदार असल्याचं ते म्हणाले.

Tags: