www. 24taas.com, नवी दिल्ली
केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात यंदा महाराष्ट्राच्या वाट्याला फार काहिसं आलं नसल्याचे समोर आलं आहे. महाराष्ट्रात २४ नव्या एक्स्प्रेस गाड्या आणि मुंबईत ७५ नव्या लोकल गाड्या देण्याची घोषणा रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी केली आहे.
रेल्वे मंत्र्यांच्या काही घोषणांमुळे मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळू शकणार आहे. मुंबईसाठी मुंबईसाठी ७५ नव्या लोकल गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे गर्दीचा प्रवास काही प्रमाणात सुखर होणार आहे. अर्थात रेल्वे मंत्र्यांनी दिलेली आश्वासने किती काळात प्रत्यक्षात येतील त्यावर सारं काही अवलंबून आहे.
* मुंबईसाठी ७५ नव्या लोकल गाड्या
* पॅसेंजरचा वेग ताशी १६० किमी नेण्याचा प्रयत्न
* पाच वर्षात सिग्नल यंत्रणेसाठी ३९ हजार ११० कोटी
* नवी मुंबई आणि पनवेलमध्ये नवीन कोचिंग संस्था
* मुंबई लोकलमध्ये १५०० नवे डबे जोडले गेले
* मुंबई ईस्ट-वेस्ट जोडण्यासाठी अभ्यास सुरू
* हार्बर लाइनवर १२ डब्यांसाठी लवकरात लवकर प्रयत्न करणार
* मुंबई- वेस्टर्न रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेही डीसीची एसी होणार
* पनवेल ते विरार जोडण्याचा प्रयत्न सुरू
* चर्चगेट विरार फास्ट कॉरिडोअरसाठी अभ्यास सुरू
* मुंबईसाठी एमयूटीपी-३ ची घोषणा
* सीएसटी-कल्याण दरम्यान नवीन रेल्वे कॉरिडोर
* अमृतसर-पाटणा-नांदेड ही गुरूपरिक्रमा स्पेशल ट्रेन सुरू करणार.
* चांदूरबाजार-नारखेड या मार्गाचा एक भाग पूर्ण केला जाणार
* अहमदनगर-नारायणडोह हा रेल्वेमार्ग २०१२-१३ या कालावधीत पूर्ण करणार
* धुळे-अमळनेर, मालेगाव-धुळे मार्गे मनमाड इंदोर, पुणे-नाशिक, या मार्गाचे मूल्यांकन करण्यासाठी नियोजन आयोगाकडे प्रस्ताव पाठविला.
* नांदेड-लातूर रोड, नवी मुंबई आणि ठाणे दरम्यान विमानतळाला जोडणारी रेल्वे लिंक, नाशिक-सिन्नर, मालेगाव-सतना-साकी-चिंचपाडा, नाशिक-सुरत, पुणे-मुंबई-अहमदबाद (हायस्पीड रेल्वे कॉरिडोर), शिर्डी-शहापूर-घोटी या मार्गांचे सर्वेक्षण करण्यात येणार
* पेण-कासू, पनवेल-आपटा, उधना-जळगाव(एक भाग), आपटा-जीते, कासू-रोहा, धरणगाव-पाळधी या मार्गांचे दुपदरीकरण २०१२-१३ या कालावधीत करण्यात येणार आहे.
* वर्धा (सेवाग्राम)-नागपूर दरम्यान तिसरी लाइन
* वसई-दिवा विद्युतीकरणासाठी सर्वेक्षण करणार
* मनमाड-मुदखेड-लिंगमपल्ली-धोन, पनवेल-पेण-रोहा मार्गाचे विद्युतीकरण करण्यासाठी सर्वेक्षण करणार
* वर्धा-नांदेड (यवतमाळ-पुसद मार्गे), अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ हे मार्ग राज्याच्या सहयोगाने पूर्ण केले जाणार आहेत.
* अहमदनगर,
* अमळनेर,
* जळगाव,
* जालना,
* कांदिवली
* कामाख्या-लोकमान्य टिळक टर्मिनस एसी एक्सप्रेस (कटिहार , मुगलसराय ,इटारसी मार्गे साप्ताहिक)
* बांद्रा टर्मिनस-भुज एसी एक्सप्रेस (आठवड्यात तीनदा)
* कोइंबतूर-बीकानेर एसी एक्सप्रेस (रोहा वसई रोड , अहमदाबाद , जोधपूर मार्गे साप्ताहिक)
* दादर टर्मिनस-तिरूनेलवेली एक्सप्रेस (रोहा कोयंबटूर इरोड मार्गे साप्ताहिक)
* विशाखापटटनम-साईनगर शिरडी एक्सप्रेस (विजयवाड़ा मनमाड मार्गे)
* साईनगर शिरडी-पंढरपूर एक्सप्रेस (कुर्दूवाड़ी मार्गे आठवड्यात तीनदा)
* आदिलाबाद-हजूरसाहिब नांदेड़ एक्सप्रेस (मुदखेड़ मार्गे दैनिक)
* मैसूर साईनगर शिरडी एक्सप्रेस (बेंगलुरु , धर्मावरम बेल्लारी मार्गे साप्ताहिक)
* बांद्रा टर्मिनस-दिल्ली सराय रोहिल्ला एक्सप्रेस (पालनपूर , फुलेरा मार्गे साप्ताहिक)
* हापा-मडगांव एक्सप्रेस (वसई रोड , रोहा मार्गे साप्ताहिक)
* बीकानेर-बांद्रा एक्सप्रेस (जोधपूर , मारवाड़ , अहमदबाद मार्गे साप्ताहिक)
* गांधीधाम-बांद्रा एक्सप्रेस (मोरबी मार्गे साप्ताहिक)
* झांसी-मुंबई एक्सप्रेस (ग्वालियर , मक्सी , नागदा मार्गे साप्ताहिक)
* 12405-12406 भुसावल हजरत निजामुददीन आणि 12409-12410 रायगढ़ निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस डीलिंक करून जबलपूर-हजरत निजामुद्दीनच्या दरम्यान स्वतंत्र गाडी
* सोलापूर-यशवंतपूर एक्सप्रेस (गुलबर्गा मार्गे आठवड्यात तीनदा)
* हैदराबाद-अजमेर एक्सप्रेस (मनमाड , इटारसी , रतलाम मार्गे साप्ताहिक)
* अमृतसर-हुजूर साह