मुख्यमंत्र्यांसाठी खड्ड्यांचा 'मेक-अप'

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. दिवाळीनंतर होणा-या नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौ-याचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री येणार असल्यामुळं नगर मनमाड रस्त्यावरचे खड्डे युद्धपातळीवर बुजवण्यात येत आहेत.

Updated: Oct 11, 2011, 07:50 AM IST

झी २४ तास वेब टीम, अहमदनगर

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. दिवाळीनंतर होणा-या नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौ-याचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री जिल्ह्यात येणार असल्यामुळं नगर मनमाड रस्त्यावरचे खड्डे युद्धपातळीवर बुजवण्यात येत आहेत. खड्ड्यांमुळं या रस्त्यावर अनेक अपघात झाले. तरीही गेल्या चार वर्षांपासून या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. आता मात्र मुख्यमंत्री येत असल्यामुळं खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलंय. तसंच जिल्ह्यात विखे-थोरात गटातला वाद थोपवून जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी देण्यासाठी मुख्यमंत्र्याचा हा दौरा आयोजित करण्यात आलाय.

Tags: