पुण्याच्या शिक्षिकेची नासाकडून दखल

पुण्याच्या विद्या वॅली स्कुलच्या वंदना सूर्यवंशी यांची निवड युएस स्पेस फाऊंडेशनच्या म्हणजेच नासाच्या २०१२ सालच्या फ्लाईट ऑफ टिचर लायझन्स कार्यक्रमासाठी करण्यात आली आहे. विद्या सूर्यवंशी या गेली वीस वर्षे जीवशास्त्र, भूगर्भ शास्त्र विषयांचे अध्यापन करत आहेत.

Updated: Feb 2, 2012, 01:20 PM IST

www.24taas.com, पुणे


पुण्याच्या विद्या व्हॅली स्कूलच्या वंदना सूर्यवंशी यांची निवड युएस स्पेस फाऊंडेशनच्या म्हणजेच नासाच्या २०१२ सालच्या फ्लाईट ऑफ टिचर लायझन्स कार्यक्रमासाठी करण्यात आली आहे. विद्या सूर्यवंशी या गेली वीस वर्षे जीवशास्त्र, भूगर्भ शास्त्र विषयांचे अध्यापन करत आहेत.

 

अवकाश आणि विज्ञान शिक्षणाच्या प्रसारासाठी निवडण्यात येणाऱ्या १९ सर्वोत्तम शिक्षकांची निवड या कार्यक्रमासाठी करण्यात येते.  अभ्यासक्रमात अवकाशावर आधारीत संकल्पनांच्या समावेश हा नव्या फ्लाईट ऑफ टिचर लायझन्सचा प्रमुख उद्देश आहे. स्पेस फाऊंडेशन यासाठी प्रशिक्षण आणि पाठवबळ पुरवतं.

 

अवकाश उद्योग आणि लष्कर यांच्या प्रतिनिधींचा समावेश असेलेले पॅनेल या कार्यक्रमासाठी शिक्षकांची निवड करतं. स्पेस फाऊंडेशन आणि नासाच्या कार्याशाळांमधल्या विशेष प्रशिक्षणाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ या कार्यक्रमसाठी निवडण्यात आलेल्या शिक्षकांना मिळतो. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील खास व्यवसायिक विकास अनुभव कार्यक्रमांचा लाभही या शिक्षकांना प्राप्त होतो.