दादांचा वादा... नोकरी नाहीच, आश्वासनं ज्यादा

मावळ गोळीबारात ज्या शेतक-यांचा बळी गेला. त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलं होतं. मावळ गोळीबाराला उद्या वर्ष पूर्ण होतंय. पण अजूनही हे आश्वासन पूर्ण झालेलं नाही. महापालिकेनं या संदर्भातला चेंडू आता राज्य सरकारच्या कोर्टात ढकललाय.

Updated: Aug 9, 2012, 09:35 PM IST

www.24taas.com, पुणे

मावळ गोळीबारात ज्या शेतक-यांचा बळी गेला. त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलं होतं. मावळ गोळीबाराला उद्या वर्ष पूर्ण होतंय. पण अजूनही हे आश्वासन पूर्ण झालेलं नाही. महापालिकेनं या संदर्भातला चेंडू आता राज्य सरकारच्या कोर्टात ढकललाय.

मावळमधली ही कुटुंबं आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.... मावळ गोळीबारात या कुटुंबांचा आधार हरवलाय. पवना धरणातून बंद पाईपलाईनच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनादरम्यान गोळीबार झाला आणि मोरेश्वर साठे, शामराव तुपे आणि कांताबाई ठाकर यांचा या गोळीबारात मृत्यू झाला.  प्रकरण जास्तच शेकेल असं दिसताच, अजित पवारांनी शेतक-यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचं आश्वासन दिलं. आज वर्ष उलटलं तरी या कुटुंबीयांना नोकरी नाही.

नोक-यांसंदर्भातला हा प्रश्न आता पिंपरी-चिंचवड महापालिकेनं राज्य सरकारच्या कोर्टात ढकललाय. मावळ गोळीबारात मरण पावलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचं आश्वासन सरकारनं कोणतीही मागणी नसताना दिलं होतं. मावळ गोळीबाराला वर्ष पूर्ण झालं तरी हे आश्वासन पूर्ण झालेलं नाही.