गुंड माजी आ.रवी पाटीलचा राष्ट्रवादीत प्रवेश

सोलापूर कर्नाटक सिमेवरील इंडिचे माजी आमदार आणि गुंड रवी पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. रवी पाटील आणि रतिकांत पाटील या दोघा भावांची गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलीये. रवी पाटील तीन वेळा कर्नाटकातल्या इंडितून निवडून आलेत

Updated: Jan 18, 2012, 05:55 PM IST

www.24taas.com, सोलापूर

 

सोलापूर कर्नाटक सिमेवरील इंडिचे माजी आमदार आणि गुंड रवी पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. रवी पाटील आणि रतिकांत पाटील या दोघा भावांची गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलीये. रवी पाटील तीन वेळा कर्नाटकातल्या इंडितून निवडून आलेत. जेलमध्ये असतानाही रवी पाटील एकवेळा निवडून आलेले आहेत. सीमाभागात या दोघा भावांची मोठी दहशत आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी पाटलांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला आहे.

 

विजयसिंह मोहिते पाटलांना शह देण्य़ासाठी रवी पाटलाच्या राष्ट्रवादी प्रवेशाची खेळी खेळण्यात आली आहे. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्य़ात शहीद झालेल्या अशोक कामटे यांनी रवी पाटील यांना मारहाण केल्याचं प्रकरण राज्यभर गाजलं होतं. अशा रवी पाटलाला राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार आवडल्यानं राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचं रवी पाटील यांनी म्हटलं आहे.