कोल्हापूर बनतयं वन वे

कोल्हापूर शहरातल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शहरातील सात रस्त्यांवरील वाहतूक एकेरी करण्यात आली. नव्या वाहतूक व्यवस्थेमुळं शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघाला. त्यामुळं कोल्हापूरकरांनी नव्या वाहतूक व्यवस्थेचं स्वागत केलं.

Updated: Nov 23, 2011, 03:37 PM IST
झी २४ तास वेब टीम, कोल्हापूर

कोल्हापूर शहरातल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शहरातील सात रस्त्यांवरील वाहतूक एकेरी करण्यात आली. नव्या वाहतूक व्यवस्थेमुळं शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघाला. त्यामुळं कोल्हापूरकरांनी नव्या वाहतूक व्यवस्थेचं स्वागत केलं.

कोल्हापूर शहरातल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पोलीस प्रशासनानं आता शहरातल्या वाहतुकीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. नव्या व्यवस्थेनुसार शहरातले सात रस्ते वन वे करण्यात आले. त्यामुळं संध्याकाळी आणि सकाळच्या वेळेत होणारी वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली.

कोल्हापूरकरांनी नव्या वाहतूक व्यवस्थेचं स्वागत केलं. तर काहीजणांनी एकेरी रस्ते अडचणीचे असल्याची तक्रार केली. वन वे असलेले रस्ते कोल्हापूरकरांच्या अंगवळणी पडावेत यासाठी काही ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आलेत. या नव्या बदलांमुळं कोल्हापूरातील वाहतूकीला शिस्त लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.