कामूद ड्रग कारखान्यावर आज पुन्हा छापा

कोंडुसकर ट्रव्हलचे मालक अभिजीत कोंडुसकरांच्या सांगलीतल्या कामूद ड्रग कारखान्यावर आज पुन्हा छापा मारण्यात आला. केटामाईनच्या उत्पादन आणि विक्रीवर सरकारने बंदी घातलीये. मात्र तरीही कामूद लिमिटेडमध्ये केटामाईनचं उत्पादन करण्यात येत होतं.

Updated: Dec 6, 2011, 08:47 AM IST

झी २४ तास वेब टीम, सांगली

 

कोंडुसकर ट्रॅव्हलचे मालक अभिजीत कोंडुसकरांच्या सांगलीतल्या  कामूद ड्रग कारखान्यावर आज पुन्हा छापा मारण्यात आला. महसूल गुप्तचर विभाग आणि केंद्रीय उत्पादन शुक्लानं केलेल्या कारवाईत एक कोटी ६७ लाखांचं  मिथाईल प्रोपेथाईन नावाचं रसायन जप्त करण्यात आलंय.

 

कामूद ड्रग्जवरील कालच्या कारवाईत ८० लाखांचे केटामाईन जप्त करण्यात आलं होतं. आज पुन्हा मोठ्या प्रमाणावर रसायन सापडल्यानं मोठी खळबळ माजलीय. याआधीही जून २०११ मध्ये कामूद ड्रग्ज लिमिटेडवर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत अभिजीत कोंडूसकर यांना अटकही करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर जुजबी कारवाई करून त्यांना सोडण्यात आलं होतं.

 

आमदारांनी थेट विधानसभेतही याबाबत आवाज उठवला होता. केटामाईनचा उत्तेजक औषध बनवण्यासाठी त्या शिवाय नशा करण्यासाठीही वापर केला जातो. त्यामुळं केटामाईनच्या उत्पादन आणि विक्रीवर सरकारने बंदी घातलीये. मात्र तरीही कामूद लिमिटेडमध्ये केटामाईनचं उत्पादन करण्यात येत होतं.