www.24taas.com, जळगाव
देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी टेबल टेनिस खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला. टेबल टेनिसच्या कोर्टावर त्यांनी जोरदार फेटकेबाजीही केली आहे. राष्ट्रपती ह्या टेबल टेनिस प्लेअर्स आहेत. त्यांनी १९५२ मध्ये टेनिसची चॅम्पियनशीप जिंकली होती. टेबल टेनिस खेळल्याने त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
राष्ट्रपती तीन दिवसाच्या जळगाव दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती ह्या एम. जे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आहेत. कॉलेजतील एका इमारतीच्या उदघाटनासाठी त्या आल्या होत्या. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या जळगावातील मूळजी जेठा कॉलेजच्या विद्यार्थिनी होत्या आणि त्याचसोबत एकेकाळच्या टेबलटेनिस चॅम्पिनयसुद्धा त्यामुळे टेबल टेनिस खेळण्याचा मोह त्यांनाही आवरला नाही.
टेबल टेनिस खेळल्यानंतर राष्ट्रपती प्रतिभाताईंनी त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा तर दिलाच, पण आजही त्या एका कसलेल्या खेळाडूप्रमाणे फटकेबाजी करीत होत्या. याचेच साऱ्यांना कौतुक वाटले.