नाशिकममध्ये नवा वीज निर्मिती प्रकल्प

नाशिकच्या एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राची क्षमता आगामी तीन वर्षांत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे याच ठिकाणी नव्याने ६६० मेगावॅटचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Updated: Nov 10, 2011, 01:22 PM IST

झी २४ तास वेब टीम, नाशिक

 

नाशिकच्या एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राची क्षमता आगामी तीन वर्षांत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे याच ठिकाणी नव्याने ६६० मेगावॅटचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. एकलहरे येथील विद्यमान प्रकल्पाशेजारीच नवा प्रकल्प उभारला जाईल. यासाठी ४ हजार ३९० कोटी रुपये खर्च येणार आहे. यापैकी ८० टक्के निधी कर्जाच्या माध्यमातून उभारला जाईल.

 

राज्य शासन २० टक्क्याप्रमाणे ८७० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. हा प्रकल्प उभारण्यासाठी एकलहरे वीज केंद्राच्या परिसरात असलेल्या कर्मचारी वसाहतीच्या २७७ इमारती पाडण्यात येतील. या इमारतींची पुनर्बांधणी करून कर्मचार्‍यांची त्याच ठिकाणी निवासाची सोय लावली जाणार आहे.