नाशिकमध्ये बिबट्याची दहशत

बिबट्याने नागरी वस्तीत येऊन धुमाकूळ घातल्याने नाशिक जिल्ह्यात अद्याप दहशत आहे. बुधवारी दिंडोरी तालुक्यातील मांदाणे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाले तर एका जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Updated: Apr 19, 2012, 08:59 PM IST

www.24taas.com, नाशिक

 

बिबट्याने नागरी वस्तीत येऊन धुमाकूळ घातल्याने नाशिक जिल्ह्यात अद्याप दहशत आहे. बुधवारी दिंडोरी तालुक्यातील मांदाणे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात  2 जण गंभीर जखमी झाले तर एका जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

दिंडोरी तालुक्यातील वणी-कळवण रस्त्यावरील  रामा देवाजी पवार यांच्या द्राक्षबागेलगत पडिक शेतजमिनीवर बिबट्या लपून बसला होता. .बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या पथकाने दुपारी कारवाई सुरु केली.  वनविभागाने जाळ्या आणि पिंजरा मागविला. पण त्यालाही तब्बल 2 तास लागले.  जेरबंद होण्याची चाहूल बिबट्याला लागताच त्याने डरकाळी फोडली. त्यावर काही युवकांनी  जाळी सोडून पळ काढला. याचाच फायदा घेत बांबूमागे लपलेल्या बिबट्याने झेप घेतली आणि हरशद शौकत सय्यद यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सय्यद यांच्या पाठीला आणि हाताला बिबट्याचे दात आणि नखं लागलीयेत.

 

तब्बल  10 तास  बिबट्या, वनविभाग, पोलीस आणि  ग्रामस्थ यांच्या पाठशिवणीचा खेळ सुरू होता. गडाच्या पायथ्याशी वणी, अभोणा,दिंडोरी पोलिसांच्या 3 सुमो जीप उभ्या करण्यात आल्या. पूर्वेकडून एका खासगी सफारीने इंजेक्शन घेतलेल्या  वनअधिकारी सुनील वाडेकरांनी काही फुटांवरून बेशुद्धीच्या इंजेक्शनचा मारा बिबट्यावर केला. तब्बल ५ वाजता 3 इंजेक्शनच्या प्रय्त्न्नानी बिबट्या बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला वनविभागाने ताब्यात घेतलं.