चिदंबरम यांनी राजीनामा द्यावा- अण्णा हजारे

टु जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी आरोप होत असलेले केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी नैतिकता ठेवून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, पतंप्रधानन मनमोहनसिंग यांनीही त्यांना पाठीशी घालू नये, अन्यथा पंतप्रधानाच्या कार्यावरही प्रश्नीचिन्ह

Updated: Oct 2, 2011, 02:28 PM IST

[caption id="attachment_1217" align="alignleft" width="221" caption="चिदंबरम यांनी राजीनामा द्यावा- अण्णा हजारे"][/caption]

झी २४ तास वेब टीम, जळगाव

 

देशात जनलोकपाल बील अमंलात आले असते तर देशाचे गृहमंत्री आज तुरूंगात राहिले असते. असे स्पष्ट मत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज व्यक्त केले.

 

शिवसेनेचे जेष्ट आमदार सुरेशदादा जैन यांनी त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीसाठी ते आज जळगाव न्यायालयात हजर झाले. यावेळी पत्रकारांशी बोलतांना म्हणाले,  देशात जनलोकपाल बील आले असते तर आज पी. चिदंबरम जेलमध्ये राहिले असते. ते सर्वात धोकेबाज आहेत, रामदेव बाबानां उपोषणासाठी परवागी दिलेली असतानाही त्याच्या कार्यकर्त्यांवर मध्यरात्री पोलिसांनी लाठीचार्ज केला. मलाही त्यांनी तुरूगात टाकले होते.

 

पंतप्रधान मनमोहनसिंग गृहमंत्री पी चिदंबरम, यांना पाठीशी घालत आहे, याबद्दल बोलतांना हजारे म्हणाले, पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यांना पाठीशी घालणे योग्य नाही. यामुळे त्यांची जनतेत असलेली त्यांचा आदर कमी होईल, तसेच त्यांच्या कामाबाबतही प्रश्नगचिन्ह निर्माण होईल.