गाडेलेले मुडदे उकरून काढणार, 'लैला' भेटणार?

लैला खान... हे प्रकरण दिवसेंदिवस जास्तच गूढ होत चाललं आहे. लैला खानची हत्या कुठे झाली? कशी झाली ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही मिळता मिळत नाही. त्यामुळे आता हे प्रकरण जास्तच गुंतागुंतीचं होत चाललं आहे.

Updated: Jul 10, 2012, 05:01 PM IST

www.24taas.com, इगतपुरी

 

लैला खान... हे प्रकरण दिवसेंदिवस जास्तच गूढ होत चाललं आहे. लैला खानची हत्या कुठे झाली? कशी झाली ? या सगळ्या  प्रश्नांची उत्तरं  काही मिळता मिळत नाही. त्यामुळे आता हे प्रकरण जास्तच गुंतागुंतीचं होत चाललं आहे. लैला खानचे दहशतवाद्यांशी काही संबंध होते का? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर आहेत.

 

पोलिसांना लैलाच्या मृतदेहाचे अवशेषही मिळालेले नसल्याने अजूनही अनेक प्रश्नांना वाचा फुटलेली नाही. त्यामुळेच आज मुंबई क्राईम ब्रान्च परवेझला घेऊन लैलाच्या इगतपुरीतल्या फार्महाऊसवर पोहोचले आहेत. बहुतेक लैलाचा मृतदेह कुठे पुरला गेला आहे. यासाठी ही टीम पोहचली आहे. आणि त्यानंतर लैला पुरलेला मृतदेह बाहेर काढला जाण्याची शक्यता आहे.

 

या ठिकाणी आज मोठं सर्च ऑपरेशन सुरू आहे. त्यामुळे परिसराला पोलिसांनी वेढा टाकला आहे. लैला खानला कुठं जाळलं होतं, हे ठिकाणही परवेझ टाकने पोलिसांना दाखवलं आहे. घटनास्थळी परवेझने दाखवलेल्या जागेवर मजुरांनी खोदकामही सुरू केलं आहे.यामुळे लवकरच लैला खान आणि तिच्या कुटुंबियांच्या मृत्युचं गुढ उकललं जाणार आहे.