खंडणी मागितल्याप्रकरणी एपीआय अटकेत

जळगाव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांना डांबून ठेवून 21 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चाळीसगावचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनोज लोहारसह पी.एस.आय. विश्वास निंबळाकर आणि धीरज येवले तिघांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल कऱण्यात आलंय.

Updated: Jun 20, 2012, 09:44 PM IST

www.24taas.com, जळगाव

जळगाव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांना डांबून ठेवून 21 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चाळीसगावचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनोज लोहारसह पी.एस.आय. विश्वास निंबळाकर आणि धीरज येवले तिघांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल कऱण्यात आलंय.

आरोपींविरोधात चाळीसगाव न्यायालयात हे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलय. याबाबतची तक्रार महाजन यांनी 30 जून 2009 मध्ये चाळीसगाव कोर्टात दाखल केली होती. यावरुन तत्कालीन पोलीस अधिक्षक संतोष रस्तोगी यांनी केलेल्या चौकशीअंती हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं.

गुन्हा दाखल झाल्यापासून लोहार अजूनही पोलिसांना मिळाले नाहीत. सीआयडी या गुन्ह्याचा तपास करत आहे. यासारख्या प्रकारांमुळे पोलिसांची समाजमानसातील प्रतिमा मलिन होत आहे.